EV स्कूटी अचानक बनली आगीचा गोळा, 3 वर्षांची चिमुकली गाडीवर चढताच.., थरकाप उडवणारा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर शहरात इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची एक थरारक घटना समोर आली आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरात इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची एक थरारक घटना समोर आली आहे. जुनी पोलीस लाईन परिसरात ही घटना घडली आहे. इथं एक व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीला शाळेतून घेऊन जाण्यासाठी आली होती. ते इलेक्ट्रीक स्कूटी घेऊन आले होते. याच वेळी शाळेच्या समोर अचानक दुचाकीला आग लागली. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एक पालक आपल्या तीन वर्षांच्या मुलीला खासगी शाळेतून आणण्यासाठी ईव्ही (EV) मोटरसायकलवरून गेले होते. मुलीला घेऊन जात असताना, जुनी पोलीस लाईनसमोर त्यांच्या गाडीतून अचानक धूर निघू लागला. गाडी चालवणाऱ्या पालकांच्या हे लक्षात आले नव्हते, मात्र त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका महिलेने गाडीतून धूर निघत असल्याचे पाहिले आणि आरडाओरडा करून पालकांना सतर्क केले.
advertisement
चिमुकलीचा वाचला जीव
दुचाकीला आग लागल्याचं समजताच पालकांनी तातडीने गाडी थांबवली. काही क्षणांतच गाडीने पेट घेण्यास सुरुवात केली होती. तोपर्यंत पालकांनी विलंब न लावता आपल्या ३ वर्षांच्या चिमुकलीला उचलून गाडीपासून लांब सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत ईव्ही मोटरसायकलवर पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला.
सोलापूरात इलेक्टिक दुचाकीला अचानक आग, चिमुकली थोडक्यात बचावली pic.twitter.com/UU3iI5NoGa
— News18 Marathi (@News18_marathi) January 20, 2026
advertisement
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
या घटनेचा संपूर्ण थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्या पद्धतीने गाडीने पेट घेतला आणि त्यानंतर पालकांनी मुलीला सुरक्षित बाहेर काढले. पण आग लागल्याचं समजायला आणखी थोडा वेळ लागला असता तर मोठा अनर्थ घडला असता, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 9:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
EV स्कूटी अचानक बनली आगीचा गोळा, 3 वर्षांची चिमुकली गाडीवर चढताच.., थरकाप उडवणारा VIDEO








