कोरोनात वडिलांना गमावलं, 'या' व्यवसायावर घर सावरलं! B.Com तरुणाची यशोगाथा
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
गणेश खुर्द हा वाणिज्य शाखेतून पदवीधर आहे. तरी त्यानं हा व्यवसाय अगदी यशस्वीरित्या संभाळलाय.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : जवळपास सर्वच घरांमध्ये अगरबत्तीचा वास दरवळतो. अगरबत्ती हे पूजेसाठी वापरलं जाणारं एक महत्त्वाचं साहित्य आहे. म्हणूनच अगरबत्तीच्या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. याच विचारातून अनेकजण अगरबत्तीचा व्यवसाय करतात. गणेश खुर्द हा तरुणही यापैकीच एक. विशेष म्हणजे तो वाणिज्य शाखेतून पदवीधर आहे. तरी त्यानं हा व्यवसाय अगदी यशस्वीरित्या संभाळलाय.
advertisement
सोलापूर शहरातील बाळे परिसरात असलेल्या खंडोबा मंदिर, सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर तसंच इतर धार्मिक स्थळांबाहेर गणेश अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करतो. यातून त्याची दिवसाची कमाई होते 500 ते 700 रुपये.
गणेश नामदेव खुर्द हा सोलापूरच्या रूपाभवानी मंदिराजवळील रहिवासी. अगरबत्तीचा व्यवसाय त्याच्या वडिलांनी सुरू केला होता. कोरोना काळात त्याच्या वडिलांचं निधन झालं. मग कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. बी.कॉमनंतर त्याला नोकरीसाठी अर्ज करायचा होता, मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तो नोकरी मिळण्याची जास्त वाट पाहू शकत नव्हता. नोकरी मिळत नसल्यानं एकेदिवशी हताशपणे बसलेला असताना त्याची नजर वडिलांच्या अगरबत्तीच्या पिशवीकडे गेली. त्या पिशवीत अगरबत्तीचे 20 पुढे शिल्लक होते. मग दुसऱ्या दिवशी त्यानं वडिलांच्या सायकलीला अगरबत्तीची पिशवी लावली आणि हा व्यवसाय पुन्हा जोमानं सुरू केला.
advertisement
सायकलपासून अगरबत्ती विक्रीची सुरूवात करणारा गणेश आज एक्सेल गाडीवर अगरबत्ती विकतो. शिवाय पूजेसाठी लागणाऱ्या इतर साहित्याची तो विक्री करतो. या व्यवसायावरच आज त्याचं कुटुंब अवलंबून आहे. शिवाय सोलापुरात त्यानं 'गणेश अगरबत्तीवाले' अशी स्वतःची ओळखही निर्माण केलीये.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
June 29, 2024 8:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
कोरोनात वडिलांना गमावलं, 'या' व्यवसायावर घर सावरलं! B.Com तरुणाची यशोगाथा

