Akluj Nagar Parishad Election : 'घायल हूं, इसलिए घातक हूँ...', शरद पवारांच्या सेनापतीमुळे चारही नगरपालिकेमध्ये भाजपची धुळधाण!

Last Updated:

Akluj Nagar Parishad Election Result : मोहिते पाटलांची ताकद असलेल्या चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का बसला आहे. अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

Akluj Nagar Parishad Election Result Mohite patil fire
Akluj Nagar Parishad Election Result Mohite patil fire
Akluj Nagar Parishad Result : लोकसभा निवडणुकीपासून भाजपला माढ्यात भाजपने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला पण मोहिते पाटील घराण्याने हाती तुतारी घेतल्यापासून भाजपला धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय. अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तब्बल 97 वर्षांच्या ग्रामपंचायतीच्या इतिहासात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे या भागावर एकहाती वर्चस्व राहिलं आहे. मात्र, यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांनी शरद पवारांना शिंगावर घेणाऱ्या मोहिते-पाटलांच्या होम ग्राउंडवर तगडं आव्हान उभं केल्याने ही लढत अत्यंत रंगतदार झाली आहे. मात्र, अखेर होम ग्राऊंडवर मोहिते पाटलांनी पुन्हा बाजी मारली.

चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का

ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला होती. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपली रणनीती गुलदस्त्यात ठेवत सस्पेन्स कायम ठेवला होता. मोहिते-पाटील कुटुंबाचा या परिसराशी चार पिढ्यांचा ऋणानुबंध असल्याने, हा बालेकिल्ला राखण्यात यश आहे. एवढंच नाही तर मोहिते पाटलांची ताकद असलेल्या चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का बसला आहे.
advertisement

शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटलांची साथ

माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला आणि अकलूज अशा चारही नगरपालिकेमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा माढा मतदार संघातील नगरपालिकेत मोहिते पाटील गटाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या वर्चस्व दिसून आलं. सांगोल्या शिवसेना शिंदे गड जरी निवडून आला असला तरी अप्रत्यक्षपणे शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटील यांची साथ लाभली होती. त्यामुळे माढ्यातील चार नगरपालिकांवर मोहिते-पाटील पॅटर्न दिसून येतोय.
advertisement

धुरंदर सिनेमाची क्रेझ थेट

करमाळ्यात मोहिनी संजय सावंत यांनी विजय मिळवला तर सांगोल्यात नंदकिशोर मुंदडा यांनी बाजी मारली. तसेच अकलूजमध्ये रेश्मा आडगळे यांना यश मिळालं. तर कुर्डूवाडीत जयश्री भिसे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर धुरंदर सिनेमाची क्रेझ थेट विरोधकांवर आरोप करताना अकलूज मध्ये दिसून आली.
advertisement

" घायल हू... इसिलिए घातक हू.."

दरम्यान, अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत असताना , " घायल हू... इसिलिए घातक हू.." अशा प्रकारची डायलॉगबाजी केली.त्यामुळे धुरंधर सिनेमाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर अकलूजच्या राजकारणात दिसली. अकलूज पालिका निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजपा असा संघर्ष झाला होता. आज निकालात मोहिते पाटील यांचे वर्चस्व निकालावर दिसून आले. याचवेळी धुरंधरचा डायलॉग भाजपावर आरोप करताना वापरण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Akluj Nagar Parishad Election : 'घायल हूं, इसलिए घातक हूँ...', शरद पवारांच्या सेनापतीमुळे चारही नगरपालिकेमध्ये भाजपची धुळधाण!
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement