आषाढीसाठी सोडलेली 'ही' एक्स्प्रेस वारीपूर्वीच रद्द; अल्प प्रतिसादामुळे निर्णय!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येतात. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनानं सुरू केलेल्या या गाडीचं अनेकजणांनी स्वागत केलं होतं.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे विशेष रेल्वे रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानं याबाबतचं प्रसिद्धीपत्रक काढलंय. ही गाडी कोणत्या दिवशी धावणार नाही, याची नोंद घेऊन प्रवाशांनी आपला प्रवास निश्चित करावा, अशी सूचना प्रशासनानं दिली आहे.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येतात. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनानं सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू - पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू ही विशेष एक्स्प्रेस गाडी नुकतीच सुरू केली होती. अनेकजणांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र अल्प प्रतिसाद मिळत असल्यानं प्रवाशांना या गाडीबाबत माहिती मिळण्यापूर्वीच प्रशासनानं तिच्या काही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीये.
advertisement
गाडी क्रमांक: 06295
सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस दिनांक 05.07.2024 आणि 07.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक: 06296
पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू विशेष एक्स्प्रेस दिनांक 06.07.2024 आणि 08.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
advertisement
गाडी क्रमांक: 06297
सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस दिनांक 06.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक: 06298
पंढरपूर - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बंगळुरू विशेष एक्स्प्रेस दिनांक 07.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 04, 2024 8:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आषाढीसाठी सोडलेली 'ही' एक्स्प्रेस वारीपूर्वीच रद्द; अल्प प्रतिसादामुळे निर्णय!