Pandharpur News: पंढरीच्या विठ्ठलाचे दिवसातून फक्त 5 तास मुखदर्शन; 15 मार्चपासून होणार मोठे बदल

Last Updated:

Pandharpur News: विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच वापरण्यात येणार आहे. भाविकांना आता 45 दिवस पदस्पर्श दर्शन घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे.

News18
News18
पंढरपूर (सोलापूर) विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी : पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी होते. रांगेत न जाता अनेकजण विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन येतात. पण आता मुखदर्शन वेळेत बदल करण्यात आला आला आहे. येत्या 15 मार्च, शुक्रवारपासून विठ्ठलाचे दिवसातून 5 तास मुखदर्शन चालू राहील, इतरवेळी मुखदर्शन घेता येणार नाही.
पहाटे 05 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंतच मुखदर्शन भाविकांना घेता येईल. तसेच विठ्ठल मूर्ती संरक्षणासाठी आता बुलेटप्रूफ काच वापरण्यात येणार आहे. भाविकांना आता 45 दिवस पदस्पर्श दर्शन घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे.
तसेच आता पंढरपूरमध्ये आता 50 फुटांवरुन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे. यासाठी विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्यात येणार आहे. यासाठी विठ्ठलाच्या दर्शन व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढल्यावर विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन करण्यास अधिक चालना मिळू शकते. या ग्रॅनाईट फरशीचा विठ्ठल मूर्तीवर परिणाम होत असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाचा आहे. त्यामुळे हे फरशी काढण्याचे काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
विठ्ठल मंदिर विकास आराखडा
दरम्यान, विठुरायाच्या राऊळीचे 700 वर्षांपूर्वीचे रुप देण्याच्या विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता ग्यानबा तुकारामांच्या काळातील राऊळी पुन्हा भाविकांना पाहायला मिळणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात मंदिर मजबुतीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. विठ्ठल भक्तांना आनंदाची बाब म्हणजे राज्य सरकारने आता 73 कोटींऐवजी 150 कोटीच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यामध्ये दर्शन रांग, दर्शन रांग, स्कायवॉक अशा कामांचा देखील अंतर्भाव या आराखड्यात केला जाईल.
advertisement
मंदिर समितीने मूळ बनविलेला आराखडा 150 कोटींचा होता. पण शासनाने मात्र सुरुवातीला फक्त 73 कोटी 80 लाखाच्या आराखड्यास निधी दिला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेत या कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी नागपूर अधिवेशनात मंदिर आराखड्याला पूर्ण निधी देण्याची मागणी केल्यावर यासाठी 150 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली होती.
view comments
मराठी बातम्या/सोलापूर/
Pandharpur News: पंढरीच्या विठ्ठलाचे दिवसातून फक्त 5 तास मुखदर्शन; 15 मार्चपासून होणार मोठे बदल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement