Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मूर्ती विक्रीचे 50 पेक्षा अधिक दुकाने, दीड कोटींची होते उलाढाल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पंढरपुरात आषाढी वारीत लाखोंच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी तसेच भाविक आले आहेत. तर या वारी कालावधीत मूर्ती विकणारे लहान मोठे व्यापारी सज्ज झाले आहेत.
सोलापूर : पंढरपुरात आषाढी वारीत लाखोंच्या संख्येने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी तसेच भाविक आले आहेत. तर या वारी कालावधीत मूर्ती विकणारे लहान मोठे व्यापारी सज्ज झाले आहेत. आषाढी वारीत देशभरातून आलेले भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन त्यांची मूर्ती आपल्या घरी घेऊन जातात आणि आपल्या घरी असलेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करतात. यात्राकाळात या व्यवसायातून एक ते दीड कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती सुनील येवणकर यांनी दिली.
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ असलेल्या महाद्वाराजवळ सुनील येवणकर हे पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या पितळ तसेच फायबरपासून तयार होणाऱ्या मूर्ती विक्री करण्याचा व्यवसाय करत आहे. यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची पितळी मूर्ती, पितळीचे टाळ यांना जास्त मागणी असते. साधारणतः पंढरपुरात 50 पेक्षा अधिक दुकाने आहेत. आषाढी वारीत पितळापासून बनलेल्या मूर्ती किंवा इतर वस्तू विक्रीतून एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सुनील येवणकर यांनी दिली.
advertisement
जवळपास दोन महिने अगोदर पासून पितळेची मूर्ती, टाळ, पुणे, उत्तर प्रदेश येथून विक्रीसाठी आणली जातात. 3 इंच पासून 2 फुटापर्यंत पितळापासून तयार केलेली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळते. तसेच फायबरपासून सुद्धा तयार केलेल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. पितळापासून तयार केलेल्या मूर्ती दीडशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे.पितळापासून तयार केलेल्या मूर्तींचे दर वजनावर ठरवले जातात.
advertisement
मागील वर्षाप्रमाणे यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मराठवाडा तसेच विदर्भातील भाविक सुद्धा येणार असल्याची माहिती सुनील येवणकर यांनी दिली. सुरुवातीला दोन ते चार दिवस गर्दी नसते. तर आता दिवसाला एक ते दोन लाख भाविक विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन त्यांची पितळापासून तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून आपल्या घरी घेऊन जात आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jul 06, 2025 9:40 AM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मूर्ती विक्रीचे 50 पेक्षा अधिक दुकाने, दीड कोटींची होते उलाढाल








