Pandharpur Wari : माऊलींच्या पालखी सोहळ्यात 2 वारकऱ्यांचा मृत्यू, मुक्कामासाठी टेंट उभा करायला गेले अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pandharpur Wari Tragic Incident : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही वारकरी नागपुरातील होते.
Sant Dnyaneshwar Palkhi : टाळ, मृदंग आणि हरिनामाचा गजर करत लाखो भाविकांसह निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शनिवारी फलटण येथील एक दिवसाच्या मुक्कामानंतर आता सोलापूरात प्रवेश करत आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा विडणीत पोहोचला. पालखी तळावर विसावल्यानंतर विडणी व परिसरातील लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या नागपुरातील दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतीये.
वीजेचा शॉक लागून मृत्यू
माऊलींच्या पालखी सोहळ्यात फलटणजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या वीजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मधुकर तुकारामजी शेंडे (56, राजाबक्षा, नागपूर) आणि तुषार रामेश्वर बावनकुळे (22) अशी या दुर्दैवी वारकऱ्यांची नावे आहेत. हे दोघंही विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.
लोखंडी रॉडला हात लावला अन्....
advertisement
मधुकर शेंडे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड (ता. फलटण) येथे होता. बरड जवळील टोलनाक्याजवळ मुक्कामासाठी टेंट उभारण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. तुषारने लोखंडी रॉडला हात लावताच त्याला विजेचा शॉक लागला आणि तो रॉडला चिकटून बसला. तुषारला बाजूला काढण्यासाठी पुढे आलेल्या मधुकररावांनाही तुषारला चिकटल्याने विजेचा तीव्र शॉक बसला.
advertisement
108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला पण...
या घटनेनंतर जवळ उपस्थित असलेल्या काही वारकऱ्यांनी तातडीने 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला. दुपारी 4.50 वाजण्याच्या सुमारास दोघांनाही उपचारासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता व्होरा यांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
advertisement
वारकऱ्यांमध्ये शोककळा
या घटनेमुळे त्यांच्यासोबतच्या सहकारी वारकऱ्यांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे. मधुकर शेंडे अविवाहित होते आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सेवा तसेच समाजसेवेसाठी समर्पित केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सक्रिय सदस्य होते आणि अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. तसेच, ते सत्संग आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असत. त्यांच्यावर आज, सोमवारी 30 जून रोजी दुपारी 2 वाजता नागपुरात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांचे परिचित चंद्रकांत चकोले यांनी दिली.
advertisement
दरम्यान, शेंडे आणि तरुण तुषार यांच्या निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवारात दुःख व्यक्त केले जात आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वीच असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 30, 2025 8:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Pandharpur Wari : माऊलींच्या पालखी सोहळ्यात 2 वारकऱ्यांचा मृत्यू, मुक्कामासाठी टेंट उभा करायला गेले अन्...