केटरिंगची ऑर्डर घ्यायला निघाले, काळाने रस्त्यातच गाठले, दोघा जिवलग मित्रांचा दुर्दैवी शेवट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: सोलापुरात दोघे तरुण मित्र केटरिंग व्यवसायातून घर चालवत होते. परंतु, मंगळवारी बार्शीकडे ऑर्डर घेण्यासाठी निघाले असताना त्यांचा दुर्दैवी शेवट झाला.
सोलापूर - सोलापूर-बार्शी राज्य मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. नान्नज गावाजवळ मंगळवारी दुपारी एसटी आणि दुचाकी समोरासमोर आल्याने हा अपघात झाला. मृत तरुण अतुल तिवारी (वय 24) आणि देवेंद्र सिंग (वय 33) हे केटरिंग व्यावसायिक असून ऑर्डर घेण्यासाठी बार्शीकडे चालले होते.
सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या अतुल आणि देवेंद्र सिंग हे दोघे केटरिंगचं काम करत होते. केटरिंग कामाची ऑर्डर घेण्यासाठी बार्शी रोडच्या दिशेने दुचाकीवरून (MH 13 BU 7542) जात होते. मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास नान्नज गावाजवळ एसटी बस (क्रमांक MH 13 11 BL 9266) आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
advertisement
या भीषण अपघातामध्ये अतुल ऋषिकेश तिवारी (वय 24) आणि देवेंद्र सिंग राम बगले (वय 33) दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना मयत घोषित केले.
advertisement
या अपघातात मृत झालेले अतुल तिवारी आणि देवेंद्र सिंग दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून ते मागील अनेक वर्षांपासून सोलापुरात केटरिंगचा व्यवसाय करत होते. बार्शी येथे एका ऑर्डरसाठी ते दुचाकीवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे सोलापूर बार्शी मार्गावरील सुरक्षिततेच्या उपाययोजनेबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
अतुल तिवारी यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. तर देवेंद्र बगले यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 10, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
केटरिंगची ऑर्डर घ्यायला निघाले, काळाने रस्त्यातच गाठले, दोघा जिवलग मित्रांचा दुर्दैवी शेवट









