Solapur Crime : बार्शीत 14 महिन्यांचा चिमूरड्याला विष पाजून आईने संपवलं आयुष्य, कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् जमीनचं हादरली!

Last Updated:

Barshi womens ends life : 14 महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. अंकिता हिचं लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झालं होतं.

Barshi womens ends life
Barshi womens ends life
Solapur Crime News : सोलापुरातील बार्शी शहरात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या 14 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकिता वैभव उकिरडे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. आईने टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न विचारला जात आहे.

खिडकीतून पाहिलं अन् धक्का बसला

बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात अंकिता यांनी हे निर्दयी कृत्य केले. घटनेच्या वेळी अंकिता मुलासह घरात एकटीच होत्या. घरकामासाठी आलेल्या एका महिलेने घरात कोणी दिसत नसल्याने खिडकीतून पाहिले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. आईने विष पाजलेल्या या 14 महिन्यांच्या मुलाला तातडीने उपचारांसाठी बार्शी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.
advertisement

14 महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात

मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. 14 महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. अंकिता हिचं लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झालं होतं. घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता घरात चिमुकल्यासह एकटीच होती, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement

आत्महत्येमागील नेमकं कारण काय?

दरम्यान, अंकिता उकिरडे यांचे चार वर्षांपूर्वी वैभव उकिरडे यांच्यासोबत लग्न झालं होतं. या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बार्शी शहर पोलीस कसून करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : बार्शीत 14 महिन्यांचा चिमूरड्याला विष पाजून आईने संपवलं आयुष्य, कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् जमीनचं हादरली!
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement