Real Heros : ज्याचं कुणी नाही, त्यांचा तो देव झाला! निराधारांचा आधार, सोलापूरकर मोहनची कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
रस्त्याच्या कडेला राहणारे, असहाय्य अवस्थेत पडलेले मनोरुग्ण, निराधार रुग्णांची सेवा सोलापूर शहरात विडी घरकुल परिसरात राहणारे यंत्रमाग कामगार मोहन तळकोकुल हे करत आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून सोलापूर शहरात तसेच ग्रामीण भागात मनोरुग्ण लोकांची सेवा करत आहेत.
सोलापूर : रस्त्याच्या कडेला राहणारे, असहाय्य अवस्थेत पडलेले मनोरुग्ण, निराधार रुग्णांची सेवा सोलापूर शहरात विडी घरकुल परिसरात राहणारे यंत्रमाग कामगार मोहन तळकोकुल हे करत आहेत. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून सोलापूर शहरात तसेच ग्रामीण भागात मनोरुग्ण लोकांची सेवा करत आहेत. मनोरुग्ण, निराधार उपाशीपोटी झोपणार नाही हा निश्चय त्यांनी केला आहे. या संदर्भात अधिक माहिती मोहन तळकोकुल यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
कशी झाली कामाची सुरुवात?
सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी येथील एका कारखान्यात यंत्रमाग कामगार म्हणून मोहन तळकोकुल हे काम करत आहेत. एके दिवशी मोहन चहा पिण्यासाठी कॅन्टीनवर आले होते. तेव्हा एक मनोरुग्ण कॅन्टीनच्या बाहेर पडलेल्या कपामधील चहा पीत होता. तेव्हा मोहन यांनी त्या मनोरुग्णाला पिण्यासाठी चहा दिला. मोहन यांना असं वाटलं की आपण या लोकांसाठी काहीतरी करू शकतो. तेव्हापासून मोहन यांनी हळूहळू मनोरुग्णांची सेवा करण्याची सुरुवात केली.
advertisement
मोफत करतात काम
आज सोलापूर शहरातील अशोक चौक, गुरुनानक चौक, अक्कलकोट रोड, एमआयडीसी परिसर, सिव्हिल हॉस्पिटल किंवा शहरातील कोणत्याही भागात मनोरुग्ण किंवा निराधार व्यक्ती दिसल्यास त्यांना मोफत जेवण, कपडे, कटिंग, दाढी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी मोहन घेत आहेत.
advertisement
सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यंत्रमाग कामगार म्हणून मोहन काम करत आहेत. तर संध्याकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मनोरुग्णांची सेवा मोहन तळकोकुल करत आहेत. कोणताही मनोरुग्ण किंवा निराधार व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही असा संकल्प आठवीपर्यंत शिक्षण शिकलेले मोहन तळकोकुल यांनी केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 30, 2025 4:54 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Real Heros : ज्याचं कुणी नाही, त्यांचा तो देव झाला! निराधारांचा आधार, सोलापूरकर मोहनची कहाणी