सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूवर शेळ्या राखण्याची वेळ, सोलापुरातील धक्कादायक वास्तव

Last Updated:

मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील कुस्तीपटू वाल्मिक माने यांनी 1979 साली शिमला येथे झालेल्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर चौथा क्रमांक पटकावला होता.

+
कुस्तीपटू

कुस्तीपटू वाल्मिक माने

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : ग्रामीण भागातील अनेक जण विविध क्रीडा प्रकारात राज्याचे, देशाचे नाव मोठे करतात. विविध क्रीडा पदके जिंकत देशाला सन्मान मिळवून देतात. मात्र, नंतरच्या काळात त्यांना कुठलीही शासकीय मदत मिळत नाही. अशामुळे अशा खेळाडूंना अत्यंत हालाखीचे जीवन जगावे लागते. देशपातळीवर कुस्तीचे मैदान मारून सुवर्णपदक मिळवलेल्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील कुस्तीपटूवर आज शेळ्या राखून संसाराचा गाडा चालविण्याची वेळ आली आहे. देशपातळीवर गावाचे आणि जिल्ह्याचे नाव गजविणारा हा कुस्तीपटू हलाखीचे जीवन जगत आहेत.
advertisement
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील कुस्तीपटू वाल्मिक माने यांनी 1979 साली शिमला येथे झालेल्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कुस्ती स्पर्धेत देशपातळीवर चौथा क्रमांक पटकावला होता. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेत राज्य पातळीवर सुवर्णपदक पटकावले होते. पण काळाच्या ओघात माने यांच्यावर हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांच्यावर आता गावाकडे शेळ्या राखून घर चालवण्याची वेळ त्यांच्या आली आहे.
advertisement
वाल्मिक माने यांनी गावातील एका टेलरकडून लंगोटा शिवून घेतला आणि गावच्या तालमीत कुस्तीसाठी पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर गावोगावी यात्रांमध्ये कुस्तीच्या स्पर्धा जिंकल्या. पुढे सोलापूरच्या पत्रातालमीत मेहनत करून अनेक मैदाने मारली. राज्य आणि देशपातळीवर अनेक कुस्ती स्पर्धा खेळल्या व अनेक पदके मिळवली.
advertisement
सोलापूरच्या सिद्धेश्वर आखाड्यातही त्यांनी कुस्तीची स्पर्धा लढली. एकनाथ धोडमिसे हे त्यांचे वस्ताद होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिकी माने यांनी राज्य व देश पातळीवर कुस्ती खेळली. पण सध्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी पैलवान वाल्मिकी माने यांना रानात शेळ्या राखून जीवन जगावे लागत आहे. म्हणून त्यांना शासनाकडून मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
advertisement
4 हजार रुपये कसेबसे जमवून स्टेशनरीचा व्यवसाय सुरू, आज महिन्याला 75 हजारांची उलाढाल, धाराशिवमधील प्रेरणादायी गोष्ट!
तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची खूप आवड आहे. हराळवाडीत शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. तर तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याची माझी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूवर शेळ्या राखण्याची वेळ, सोलापुरातील धक्कादायक वास्तव
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement