पोरगा पोलिसांच्या ताब्यात, बारावीचा पेपर चुकला, लेकाचं 'ते' कृत्य जिव्हारी; वडिलांना हार्ट अटॅक
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आरोपींनी पीडितेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कुकृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नागपूर : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे शहरात एकच संतापाची लाट उसळली आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. आरोपींनी पीडितेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कुकृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही अकरावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. मुख्य आरोपी बारावीचा विद्यार्थी असून दोघांचा पूर्वीपासून परिचय होता. आरोपीने याआधी तिच्याशी अश्लील वर्तन केल्याने ती त्याला टाळत होती. मात्र वारंवार येणाऱ्या संदेशांमुळे तिने अखेर बोलण्याची तयारी दर्शवली. आरोपीने तिला घरी भेटायला बोलावले. घरी इतर सदस्य असतील, असा अंदाज असल्याने ती ५ फेब्रुवारी रोजी त्याच्याकडे गेली. मात्र प्रत्यक्षात त्याच्यासोबत त्याचे दोन अल्पवयीन मित्र होते.
advertisement
धमकी देत केला अत्याचार
बोलण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला घरातील एका खोलीत नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. बाहेर असलेल्या दोघांनी मोबाईलवर व्हिडीओ बनविल्याची बतावणी करत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे पीडिता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे हादरली होती. अखेर तिने धैर्य एकवटून कुटुंबीयांना सर्व हकिगत सांगितली. त्यानंतर नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
advertisement
वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचा मंगळवारी बारावीचा पहिला पेपर होता. मात्र पोलिस कोठडीत असल्याने तो परीक्षेला बसू शकला नाही. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुलीला इम्प्रेस करण्यावरच त्याचा भर असल्याचे तपासात समोर आले आहे. या कुकृत्याची माहिती मिळताच आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
कठोर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, या घटनेमुळे नागपूरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवत पीडितेला सर्वतोपरी मदत आणि संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
हे ही वाचा :
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 5:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरगा पोलिसांच्या ताब्यात, बारावीचा पेपर चुकला, लेकाचं 'ते' कृत्य जिव्हारी; वडिलांना हार्ट अटॅक








