Nawab Malik : अजित पवारांसाठी नवाब मलिक गेटवर थांबले, पुढे काय झालं? Video

Last Updated:

मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनाआधीचा नवाब मलिक आणि अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजित पवारांसाठी नवाब मलिक गेटवर थांबले, पुढे काय झालं?
अजित पवारांसाठी नवाब मलिक गेटवर थांबले, पुढे काय झालं?
मुंबई : मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने विधानसभेत संमत करण्यात आलं, त्यामुळे मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळालं आहे. विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदेतही मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेत विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक उपस्थित होते. अधिवेशनासाठी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर सर्वात शेवटच्या बाकावर बसले होते.
अधिवेशनासाठी नवाब मलिक आले तेव्हा त्यांनी विधिमंडळाच्या गेटवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. अजित पवार येत असताना नवाब मलिक गेटवर उभे होते, त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंद बोलणं झालं, यानंतर अजित पवार पुढे निघून गेले.
advertisement
नवाब मलिकांवरून वाद
याआधी नवाब मलिक यांच्यावर हिवाळी अधिवेशनात वाद झाला होता. नागपूरमध्ये झालेल्या या अधिवेशनावेळी नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले होते, त्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला होता, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं होतं. मलिकांना महायुतीत घ्यायला विरोध असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट म्हणलं. सत्ता येते, सत्ता जाते पण देश महत्त्वाचा आहे, असंही फडणवीस या पत्रात म्हणाले होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nawab Malik : अजित पवारांसाठी नवाब मलिक गेटवर थांबले, पुढे काय झालं? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement