ड्युटीवर जॉईन व्हायचं राहून गेलं, दुचाकीची समोरासमोर धडक, SRPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:sachin Salve
Last Updated:
हा अपघात इतका भीषण होता की, होंडा युनिकॉन बाईकचा समोरील भागाचा चक्काचूर झाला.
रवी सपाटे, प्रतिनिधी
गोंदिया : गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमगाव ते ठाणा रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात आमगाव गोंदिया मार्गावरील ठाणा परिसरात ही घटना घडली. राजेश सखाराम मडावी (वय 24 वर्ष रा. चिखली तालुका कुरखेडा जि. गडचिरोली) असं मृतकाचं नाव आहे. तर या अपघातात २ जण जखमी झाले आहे. गंभीर जखमीमध्ये गोकुळ अभिमन्यू खांडवाये (वय 30 वर्ष रा. तारटोला, कुरखेडा), विकास मनोहर बागडे (वय 30 वर्ष रा. गोंदिया) असे जखमींची नावं आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक राजेश सखाराम मडावी हे एसआरपीएफ गट क्रमांक 18, काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी नोकरीवर होते. नुकतीच त्यांची जॉईनिंग झाली होती. मडावी आपल्या मित्रासोबत चिखली कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथून गोंदिया येथे जात पडताळणीसाठी ऑफिसला आले होते. काम झाल्यानंतर ते परत गडचिरोली वरून जात असताना त्यांच्या आमगाव गोंदिया मार्गावरील ठाणा परिसरात अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, होंडा युनिकॉन बाईकचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. तर दुसऱ्या बाइकचीही हीच अवस्था झाली. या अपघातात राजेश सखाराम मडावी यांचा मृत्यू झाला.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून जखमींना उपचाराकरिता शासकीय रुग्णालय गोंदिया इथं पाठवण्यात आलं. आमगाव पोलीस स्टेशन इथं घटनेची नोंद करण्यात आली.
Location :
Gondiya,Maharashtra
First Published :
February 08, 2025 5:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ड्युटीवर जॉईन व्हायचं राहून गेलं, दुचाकीची समोरासमोर धडक, SRPF जवानाचा दुर्दैवी मृत्यू