SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अखेर निकालाची तारीख आली समोर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
SSC Result Date : राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे.
मुंबई : बरावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result) धाकधूक वाढली आहे. दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024, MH बोर्ड 2024 ची अधिकृत वेबसाइट: https://mahahsscboard.in/. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी थेट लिंक: http://mahresult.nic.in/ किंवा https://mh-ssc.ac.in. कोणत्याही विद्यार्थ्याला वाटले की त्याला किंवा तिला कमी नंबर मिळाले आहेत, तर ते महाराष्ट्र एसएससी बोर्डाद्वारे आयोजित केलेल्या रिपीट परीक्षेत बसू शकतात.
advertisement
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 कसा बघायचा?
महाराष्ट्र बोर्ड 2024 च्या अधिकृत साइटला भेट द्या, "mahahsscboard.in" किंवा "mahresult.nic.in" आहे.
एकदा तुम्ही एसएससी निकालावर टॅप केल्यानंतर, एक नवीन टॅब उघडेल.
तुमची वैयक्तिक माहिती जसं की नाव, रोल नंबर आणि आईचे नाव टाइप करा. ओके बटणावर क्लिक करा.
advertisement
तुमचा निकाल तपासा आणि तो डाउनलोड करा.
महाराष्ट्र बोर्ड 2024 चा निकाल कसा तपासायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्या आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपल्या. सध्या इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत, जो निकाला मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बोर्ड 2024 चा निकाल पाहण्यासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahahsscboard.in/.
advertisement
निकाल गुणपत्रिका म्हणून घोषित केले जातात. विद्यार्थ्याच्या निकालबद्दल तपशीलवार माहिती नमूद केली जाते. निकालामध्ये एकूण टक्केवारी, निकालाची स्थिती आणि ग्रेडसाठी विभाग देखील समाविष्ट आहेत. निकालाची स्थिती उत्तीर्ण झाल्यास, विद्यार्थ्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2024 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अखेर निकालाची तारीख आली समोर


