बारावी परीक्षेत पुण्याच्या इशिताला 97.33 टक्के गुण, क्लास न लावता कसं मिळवलं यश?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकणारी इशिता गोडसे ही 97.33 टक्के गुण मिळवत कॉलेजमधून दुसरी आली आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. राज्यातून 14 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा राज्यात बारावीचा निकाल हा 93.37 टक्के लागला आहे. तर पुण्याचा निकाल हा 97.82 टक्के इतका लागला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यश मिळवले आहे. पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमध्ये शिकणारी इशिता गोडसे ही 97.33 टक्के गुण मिळवत कॉलेजमधून दुसरी आली आहे.
advertisement
कसं मिळवलं यश?
इशिता ही मूळची पुण्याची आहे. पुण्यातील कॉमर्स शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या बीएमसीसी कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती. तिने कुठला ही क्लास न लावता स्वतः अभ्यास करत दुसरा नंबर मिळवत घवघावीत यश संपादन केलं आहे. एकूण 600 पैकी तिला 584 मार्क्स मिळाले आहेत. संस्कृत आणि बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत तर वाणिज्य व्यवस्थापन आणि संघटण या विषयात 97 गुण, गणित 99 गुण आणि अर्थशास्त्र विषयात 95 गुण तर इंग्रजी विषयात 88 गुण तिने मिळवले आहेत. यामुळे तिचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जातं आहे.
advertisement
बारावी परीक्षेत राज्यात अव्वल, कोण आहे 100 टक्के गुण मिळवणारी तनिषा बोरामणीकर?
वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाची तयारी केली. बोर्ड परीक्षेत जेवढे मार्क्स हवेत तेवढे मार्क्ससाठी मी कॉलेजमधील प्रिलीयम परीक्षेसाठी अभ्यासाची तयारी केली. आई- वडील दोघांचे कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे दहावीनंतर कॉमर्स या शाखेची निवड केली. तसेच कॉलेजमधील सगळ्याच शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तर आई- वडिलांनी देखील अभ्यासात मदत केली. तर अभ्यासाशिवाय इतर कॉलेजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात देखील माझा सहभाग होता. सात्याने केलेला अभ्यास यामुळे मला हे यश मिळालं आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांनी इशिता गोडसे हिने दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 22, 2024 9:04 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
बारावी परीक्षेत पुण्याच्या इशिताला 97.33 टक्के गुण, क्लास न लावता कसं मिळवलं यश?