सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष पण तटकरे-प्रफुल पटेलांच्या पदाचा उल्लेख नाही, राष्ट्रवादीत संघर्षाला सुरुवात?
- Published by:Prachi Amale
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. त्याचं कारण म्हणजे पक्षात पडद्यामागे सुरु असेलल्या अनेक घटना घडामोडी. दादांच्या निधनानंतर कार्यकारी अध्यक्षांनी घेतलेले निर्णय नव्यानं अध्यक्ष झालेल्या सुनेत्रा पवारांनी रद्द केले. दरम्यान एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख केला आहे. तर सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा पदाशिवाय उल्लेख केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याचवेळी ठराव पारित करण्यात आला होता. विशेष म्हणजे 10 मार्च रोजी हे ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला कळवले आणि त्याचवेळी हे देखील नमूद केले की 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार अधिकृत म्हणून गृहीत धरला जाऊ नये. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीतील निर्णय आणि पदाधिकारी यादी आम्ही आत्ता निवडणूक आयोगाला सादर करत आहोत. या यादीत सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
advertisement
पत्रात फक्त दोन नावांचा पदासह उल्लेख
सुनेत्रा पवारांनी आयोगाला सादर केलेल्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख केला आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गरजे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख केला आहे. यामध्ये लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे सुनील तटकरे यांचाही प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही आणि प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही.
advertisement
कोणाकोणाचा पत्रात उल्लेख?
- राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार
- खजिनदार शिवाजीराव गरजे
खालील नावांचा उल्लेख पदाशिवाय
- प्रफुल्ल पटेल
- सुनील तटकरे
- छगन भुजबळ
- माणिकराव कोकाटे
- दिलीप वळसे पाटील
- चेतन तुपे
- शेखर निकम
- सुबोध मोहिते
- सरोज अहिरे
- जय पवार
- धीरज शर्मा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 8:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष पण तटकरे-प्रफुल पटेलांच्या पदाचा उल्लेख नाही, राष्ट्रवादीत संघर्षाला सुरुवात?







