RTO Rules : गाड्यांना प्रखर लाईट बसवणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! RTO ला दिले हे मोठे आदेश

Last Updated:

Bright Lights Ban : जर तुम्ही वाहन चालवता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतुकीच्या दिव्या संबंधित नवीन नियम जाहीर झालेले आहेत.

News18
News18
मुंबई : जर तुम्ही गाडी चालवता तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षात अनेक शहरांत आता वाहनांवर नवीन प्रकारचे प्रखर दिवे बसवण्याची फॅशन सुरू झाली आहे. वाहन उत्पादक कंपन्यांनी दिलेली मानक दिवे सोडून अनेक वाहन चालक वेगवेगळ्या रंगांचे आणि अत्यंत प्रखर दिवे लावतात. त्यामुळेच आता वाहनावर अनधिकृत प्रखर दिवे असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
अनेक वाहन चालक आपल्या वाहनांना कंपन्यांनी दिलेल्या मानकासह दिवे सोडून पिवळे किंवा प्रखर पांढरे लावत असतात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकांचे डोळे असह्य होतात आणि अपघात होण्याची शक्यता वाढते. अलीकडे अशा प्रखर दिव्यांमुळे अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा मृत्यूही झाला आहे.
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांवर कारवाई करण्याची योजना जाहीर केली आहे. जर कोणाच्या वाहनावर अनधिकृत प्रखर दिवे असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे अपघात होण्याचा धोका कमी होईल. वाहन कंपन्यांनी दिव्यांसाठी ठरवलेली नियमावली असते, पण काही जण अतिरिक्त दिवे लावून रस्त्यावर धोका निर्माण करतात.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाने देखील रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. देशभरात हेल्मेट वापरणे, लेन ड्रायव्हिंगचा नियम पाळणे, अनधिकृत हॉर्न बंद करणे आणि पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गांसह इतर रस्त्यांवर डिझाइन, बांधकाम आणि देखभाल नियम पाळण्याचे आदेश आहेत. 50 प्रमुख शहरांमध्ये रस्ते अभियांत्रिकी ऑडिट करुन कमतरता शोधण्याचे आणि झेब्रा क्रॉसिंग, रस्त्यावर योग्य प्रकाशयोजना, रस्त्याचे विभाजन, सीसीटीव्ही देखरेख आणि शाळा आणि उच्च-जोखीम क्षेत्रे सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत.
advertisement
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकी चालकांसह मागे बसणाऱ्यांसाठीही हेल्मेट अनिवार्य केले आहे. चमकदार LED दिवे, लाल-निळे स्ट्रोब दिवे आणि अनधिकृत हॉर्नवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच लेन ड्रायव्हिंग नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश आहेत. एकंदरीत रस्ते सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी, नियमांचे काटेकोर पालन करणे ही सर्व वाहन चालकांची जबाबदारी आहे. प्रखर दिवे लावणे टाळले पाहिजे आणि फक्त मानक दिवे वापरणे सुरक्षित ठरेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RTO Rules : गाड्यांना प्रखर लाईट बसवणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका! RTO ला दिले हे मोठे आदेश
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement