Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत चांगले संबंध..., देशमुख प्रकरणात आरोपांचे रान उठवणारे धस 'हे' काय बोलून गेले?

Last Updated:

भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते. यावेळी देशमुख हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मिक कराडला भेटल्याचा दावा कराड कुटुंबियांनी केल्याचा सवाल माध्यमांनी केला होता. यावेळी कुटुंबाचा हा दावा सुरेश धस यांनी फेटाळत मी वाल्मिक कराडला मी नाही भेटलो, अशी स्पष्टोक्ती दिली.

Suresh Dhas on Walmik Karad
Suresh Dhas on Walmik Karad
Suresh Dhas on Walmik Karad : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग आला आहे. वाल्मिक कराडवर मंगळवारी मकोका लावण्यात आला आहे. आज या संदर्भात बीडच्या न्यायालयात सूनावणी पार पडणार आहे. तत्पुर्वी या देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांचे रान हे भाजप आमदार सुरेश धस यांनी पेटवले होते. याच सुरेश धस यांनी आज वाल्मिक कराडसोबत चांगले संबंध असल्याचे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
भाजप आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते. यावेळी देशमुख हत्या प्रकरणाच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मिक कराडला भेटल्याचा दावा कराड कुटुंबियांनी केल्याचा सवाल माध्यमांनी केला होता. यावेळी कुटुंबाचा हा दावा सुरेश धस यांनी फेटाळत मी वाल्मिक कराडला मी नाही भेटलो, अशी स्पष्टोक्ती दिली. वाल्मिकसोबत माझं काय वाईट होतं. मात्र वाल्मिकसोबत माझे चांगले संबंध होते. पण वाल्मिक कराड या प्रकारे माणस मारायला लागला तर मग त्याच समर्थन करायचं का? दोस्त आहे, मैत्री आहे, पण असं वागायला लागल्यावर त्याच्यासोबत राहायचं का? असा प्रतिसवाल सुरेश धस यांनी माध्यमांना केला.
advertisement
तसेच आज वाल्मिक कराडला कोर्टात नेते जात असताना त्याने रोहित अशी हाक मारली? त्यामुळे हा रोहित नेमका कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला.यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, रोहित हा त्याच्या हाताखालचा माणूस आहे. रोहित कांबळे करून. काय आता मदतीला वगैरे लागत असेल,असे धस यांनी सांगितले.
कराड समर्थकांकडून परळी बंदच्या घोषणेवर बोलताना सुरेश धस म्हणाले की, परळी बंद ही नाविन्यपूर्ण योजना आहे.आपला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर ज्याने इतका मोठा उद्योग केला आहे. हा माणूस जेलमध्ये गेल्यानंतर बीड, परळी बंद करणे कितपत योग्य आहे. हा नवीन पायंडा आहे.इसके बाद जो भी जेल मे जाएगा, उसके लिए हम तुम्हारे साथ है. म्हणून आता शहर बंद करून टाकली. एखाद्यावेळेस मुंबईही बंद करून टाकतील, असा टोला धसांनी कराड समर्थकांना लगावला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : वाल्मिक कराडसोबत चांगले संबंध..., देशमुख प्रकरणात आरोपांचे रान उठवणारे धस 'हे' काय बोलून गेले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement