निष्ठा गांधी घराण्याशी! सुशीलकुमारांची लेक जपतेय वारसा, प्रियांकांसोबत 'त्या' क्षणी होत्या सोबत!
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सुशीलकुमार शिंदे हे दिग्गज काँग्रेसी आणि एक प्रेमळ राजकारणी म्हणून ओळखले जातात. सर्वात महत्त्तवाचे म्हणजे ते गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणूनही ओळखले जातात.
मुंबई : लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत पोहचल्या आणि त्यांनी पहिल्याच केलेल्या भाषणात लोकसभा गाजवली. भाषणाच्या सुरूवातीलाच प्रियंका गांधी यांनी 13 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ल्यावेळी संसदेच्या सुरक्षा करत असताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचार्यांना श्रध्दांजली अर्पण केली. ज्यावेळी प्रियंका गांधी श्रद्धांजली वाहण्याकरता गेल्या त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या दोन महिला खासदार होत्या. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड होत्या.
प्रियंका गांधी ज्यावेळी श्रद्धांजली वाहण्याकरता गेल्या त्यावेळी प्रणिती शिंदे देखील त्यांच्यासोबत होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिंदे कुंटुंब कायमच काँग्रेसचे निष्ठावन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे दिग्गज काँग्रेसी आणि एक प्रेमळ राजकारणी म्हणून ओळखले जातात. सर्वात महत्त्तवाचे म्हणजे ते गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणूनही ओळखले जातात. आज त्यांची लेक त्यांचा हा वारसा पुढे नेत आहे. खासदार म्हणून प्रियंका गांधींते आज पहिले भाषण होते. संसद परिसरात आज प्रणिती शिंदे या त्यांच्यासोबत दिवसभर होत्या. हे चित्र पाहिल्यानंतर शिंदेंची दुसरी पिढी देखील वडिलांचा वारसा नेत असल्याचे दिसले.
advertisement
काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून प्रणिती शिंदे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे म्हणजे, काँग्रेसच्या युवा नेत्या. काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांची ओळख. सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा वारसा प्रणिती शिंदेंकडे गेला. प्रणिती शिंदेंनी सलग तीन वेळा सोलापुरातून आमदारकीची हॅट्रिक घेतली प्रणिती शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क, मनमिळावू पण, प्रसंगी धाडसी आणि आक्रमक होण्याचा स्वभाव, प्रभावी वत्कृत्व या गुणांमुळे प्रणिती यांनी वडिलांप्रमाणेच अल्पावधीत स्वत:ला सिद्ध करून दाखवलंय.
advertisement
काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांवरून टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी उत्तर प्रदेशातील संभल इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर टीका केली. पहिल्या भाषणात प्रियंका गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या नावांसह स्वातंत्र्य चळवळीतील सर्व नेत्यांचा उल्लेख केला. प्रियंका गांधीनी नेहरूंचे नाव घेतल्यावर काँग्रेसच्या खासदारांनी बाक वाजवून त्यांचे समर्थन केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2024 7:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निष्ठा गांधी घराण्याशी! सुशीलकुमारांची लेक जपतेय वारसा, प्रियांकांसोबत 'त्या' क्षणी होत्या सोबत!


