Tamhini Ghat Accident : मोमोज स्टॉलने पुण्याच्या साहिलंच आयुष्य बदललं…मात्र ताम्हिणी घाटात एका क्षणात सगळं संपलं!

Last Updated:

Tamhini Ghat Accident : मृतांमध्ये 24 वर्षांचा साहिल गोठे हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे पुण्यात तीन स्टॉल होते.

News18
News18
रायगडमधील ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघाताने पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली. एका नवीन थार गाडीसह कोकण भ्रमंतीसाठी निघालेल्या २१ ते २२ वयोगटातील सहा तरुणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील हे सर्व तरुण आपल्या नवीन कोऱ्या थार गाडीतून कोकणात फिरायला निघाले होते, पण मंगळवारी त्यांची ही कार घाटातील ५०० फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात जीवघेणा ठरला.
मोमोजचा व्यवसाय उभारणाऱ्या साहिलचे स्वप्न अधुरं
मृतांमध्ये 24 वर्षांचा साहिल गोठे हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचे पुण्यात तीन स्टॉल होते. गरिबीशी झुंज देऊन स्वतःची थार कार घेणारा आणि पुण्यात तीन-चार ठिकाणी मोमोजचा व्यवसाय यशस्वीपणे उभा करणारा उद्योजक म्हणूनही परिसरात ओळखला जात होता. अवघ्या २० दिवसांपूर्वी त्याने ही नवीन थार कार घेतली होती. आपले जिवलग मित्र शिवा माने (२०), प्रथम चव्हाण (२३), श्री कोळी (१९), ओमकार कोळी (२०) आणि पुनीत शेट्टी (२१) यांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण दाखवण्यासाठी निघाला होता. पण, गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात त्यांच्या सगळ्यांच्याच स्वप्नांचा करुण अंत झाला.
advertisement
बचाव कार्य सुरू
अपघाताची माहिती मिळताच दरीत कोसळलेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेच्या रेस्क्यू टीमने हा अत्यंत अवघड बचाव कार्य हाती घेतलं. पोलीस प्रशासनही या बचाव कार्यात मदत करत आहेत. रेस्क्यू टीम दोरखंडाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत आहेत. सध्या चार तरुणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत, तर उर्वरित दोघांचा शोध अजूनही घेतला जात आहे.
advertisement
एक ट्रिप ठरली शेवटची...
अवघ्या विशी-बाविशीतील सहा तरुणांनी एकत्र जमून केलेली ही कोकणची पहिली ट्रिप, त्यांच्या आयुष्याची शेवटची ट्रिप ठरली. व्यवसायात यश मिळवून नवी गाडी घेतलेला साहिल आपल्या मित्रांना पहिल्यांदाच कोकणचे सौंदर्य दाखवायला निघाला होता, पण नियतीने या तरुणांच्या नशिबी ताम्हिणी घाटाची खोल दरी लिहिली होती. कोंडवे धावडे गावातील या सहा तरुणांचा एका क्षणात झालेला अंत त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि संपूर्ण परिसरासाठी एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करणारी घटना आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tamhini Ghat Accident : मोमोज स्टॉलने पुण्याच्या साहिलंच आयुष्य बदललं…मात्र ताम्हिणी घाटात एका क्षणात सगळं संपलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement