अल्पवयीन प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला पेटवले, जिवंत जाळण्याचा प्रयत्न, ठाण्यातील घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
क्षुल्लक वादावरून अल्पवयीन प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला पेटवले. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून आरोपीला बालसुधारगृहात नेण्यात आले.
प्रतिनिधी, ठाणे: क्षुल्लक वादावरून अल्पवयीन प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलगी ८० टक्के भाजली असून आरोपीला बालसुधारगृहात नेण्यात आले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मुलगी पेटत असतानाही आरोपी तिच्या घरात उपस्थित होता.
नेमकी घटना काय?
ठाण्यातील कापूरबावडी परिसरातील १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहत असून या पूर्वी ही मुलगी पूर्वी मुंबईतील चेंबूर परिसरात राहत होती. त्याच काळात तिची ओळख त्याच भागातील एका मुलासोबत झाली. काही दिवसांपूर्वी भाऊबीज निमित्त ती चेंबूरला गेली असता, तिचा त्या मुलासोबत किरकोळ वाद झाला. त्याने तिला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. नंतर मुलगी प्रचंड भेदरलेली होती. २४ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील तिच्या घरात मुलगी घरी एकटी असताना अचानक घरातून धूर येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी तिच्या आईला कळवले.
advertisement
आई घरी परतल्यावर तिने पाहिले की, मुलगी भाजलेल्या अवस्थेत पडलेली आहे आणि तिचा मित्र (प्रियकर) घरातच उपस्थित होता. त्याला प्रश्न विचारताच तो तिथून पसार झाला. जखमी मुलीला तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करत याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलीस रुग्णालयात पोहोचून तिच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत तिचा अल्पवयीन मित्र याला ताब्यात घेत त्याची चौकशी करून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहेत. मात्र या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी 70 ते 80 टक्के भाजली असून तिला या आरोपीने पेटवले की तिने स्वतःहून पेट्रोल टाकून आत्महत्या केली याचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 28, 2025 4:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अल्पवयीन प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला पेटवले, जिवंत जाळण्याचा प्रयत्न, ठाण्यातील घटना


