Thane Accident News : ठाणे हादरलं! घोडबंदर रोडवर विचित्र अपघात; ५ ते ६ कारची धडक, वाहनांचा चक्काचूर
- Reported by:AJIT MANDHARE
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Thane Accident News: ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या घोडबंदर रोडवर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे.या विचित्र अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
ठाणे: ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या घोडबंदर रोडवर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. गायमुख घाटात सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाच ते सहा गाड्यांची एकमेकांना समोरासमोर धडक झाली. या विचित्र अपघातामुळे घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ च्या सुमारास गायमुख घाटाच्या वळणावर एकामागून एक अशा ५ ते ६ गाड्यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहभागी असलेल्या सर्व गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली या अपघाताचे भीषण स्वरूप पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
वाहतूक कोंडीचा प्रवाशांना फटका अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्याकडून बोरीवली आणि गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कामावर जाण्याच्या वेळेतच हा अपघात झाल्याने नोकरदार वर्ग आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
घटनास्थळी पोलीस आणि क्रेन दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तरीही रस्ता मोकळा होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Accident News : ठाणे हादरलं! घोडबंदर रोडवर विचित्र अपघात; ५ ते ६ कारची धडक, वाहनांचा चक्काचूर










