Thane Election Results : महाराष्ट्रातला सगळ्यात धक्कादायक निकाल, शिंदेंच्या अंगणात ठाकरेंच्या उमेदवाराचा विजयी गुलाल, ठाण्याचा जाएंट किलर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला जोरदार यश मिळालं आहे, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का लागला आहे.
ठाणे : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला जोरदार यश मिळालं आहे, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का लागला आहे. ठाणे महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व राहिलं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या अंगणामध्येच त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. एकनाथ शिंदे राहतात त्याच वॉर्डमध्ये शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे.
एकनाथ शिंदे राहतात त्या वॉर्डमध्ये शिवसेनेने माजी महापौर अशोक वैती यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, पण ठाकरे गटाचे शहाजी खुस्पे यांनी वैती यांचा पराभव केला. शहाजी खुपसे यांनी अशोक वैती यांचा 667 मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक 13 मधल्या 4 प्रभागांपैकी तीन जागांवर शिवसेनेचा विजय झाला, पण एका जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गेम फिरवला.
advertisement
प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये शहाजी खुस्पे यांना 12,860 मतं मिळाली तर शिवसेनेच्या अशोक वैती यांना 12,193 मतांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय 13 ब मध्ये शिवसेनेच्या निर्मला कणसे यांनी शिवसेना उबाठा उमेदवार अनिता हिंगेंचा पराभव केला. 13 कमध्ये शिवसेना उबाठाच्या वैशाली घाटवळ यांच्याविरोधात वर्षा शेलार यांनी विजय मिळवला. 13 ड मध्ये शिवसेनेच्या अनिल भोर यांनी शिवसेना उबाठाच्या संजय दळवी यांना पराभवाची धूळ चारली.
advertisement
ठाणे प्रभाग क्रमांक 13 निकाल
अ - शहाजी खुस्पे (उबाठा) 12860 विजयी विरुध्द शिंदे सेनेचे अशोक वैती - 12193 मते पराभुत
ब - निर्मला कणसे (शिंदे सेना) 14976 विजयी विरुद्ध उबाठाच्या अनिता हिंगे - 10034 मते
क - वर्षा शेलार (शिंदे सेना) - 12411 विरुद्ध उबाठाच्या वैशाली घाटवळ - 11316 मते
advertisement
ड - अनिल भोर (शिंदे सेना) - 11759 विरुद्ध उबाठाचे संजय दळवी 11503 मते
ठाण्यात शिवसेना-भाजप सुस्साट
ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना 45, भाजप 12, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3, शरद पवारांची राष्ट्रवादी 4, शिवसेना उबाठा 6, मनसे 2 आणि एका जागेवर इतर उमेदवार आघाडीवर आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 4:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Election Results : महाराष्ट्रातला सगळ्यात धक्कादायक निकाल, शिंदेंच्या अंगणात ठाकरेंच्या उमेदवाराचा विजयी गुलाल, ठाण्याचा जाएंट किलर!










