Thane to Navi Mumbai Airport: वेळ वाचणार! ठाण्यातून नवी मुंबई विमानतळ सुसाट प्रवास, कसा असेल नवा एलिव्हेटेड मार्ग?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane to Navi Mumbai: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिसेंबरमध्ये प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. ठाणे ते नवी मुंबई विमानतळ नव्या उन्नत मार्गाची निर्मिती होणार आहे.
नवी मुंबई: ठाण्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानळाला जाण्याचा प्रवास आता सुसाट होणार आहे. या ठिकाणांना 25.2 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्ग प्रकल्पाद्वारे जोडण्यात येणार आहे. सिडकोने नुकतेच या प्रस्तावित मार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे. आता पुढील नियोजन करून तीन वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
कसा असेल उन्नत मार्ग?
ठाणे ते नवी मुंबई नव्या उन्नत मार्ग प्रकल्पासाठी सुमारे 6 हजार 362 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो ठाणे येथील धन निरंकारी चौकाजवळील पटनी मैदानापासून वाशी येथील पाम बीच रोडपर्यंत 6 लेनचा म्हणजेच 3 अधिक 3 लेनचा असणार आहे. या मार्गावर सहा ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. त्यात कोपरी-पटणी पूल, ऐरोली-घणसोली, घाटकोपर-कोपरखैरणे, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोड आणि उलवे कोस्टल रोड यांचा समावेश आहे.
advertisement
प्रकल्प आराखडा तयार
उन्नत मार्गचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने प्रकल्प अहवाल तयार केला असून त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे झाले आहे. “एलिव्हेटेड मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार असून शासनाने त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. सल्लागारासह कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिसेंबरमध्ये प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर ताण अपेक्षित आहे. त्यामुळे विमानतळाला जलद आणि सुरळीत कनेक्टिव्हिटीसाठी उन्नत मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
August 22, 2025 9:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane to Navi Mumbai Airport: वेळ वाचणार! ठाण्यातून नवी मुंबई विमानतळ सुसाट प्रवास, कसा असेल नवा एलिव्हेटेड मार्ग?


