डोंबिवलीत परप्रातीयांची मुजोरी, मराठी कुटुंबाच्या सत्यनारायण पूजेला विरोध, नेमकं काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
Marathi-Amrathi Controversy: डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी - अमराठी वाद उफाळून आला आहे. अमराठी कुटुंबाने सत्यनारायण पूजेला विरोध केल्याने सोसायटीतील दोन गट आमने-सामने आले आहेत.
डोंबिवली: कल्याण डोंबिवली मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. डोंबिवली नांदीवलीमधील एका सोसायटीत सत्यनारायण व हळदीकुंकू समारंभाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला. तसेच त्यांनी मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांतील महिलांनी केला आहे. सोमवारी, 27 जानेवारीला रात्री सोसायटीमध्ये या वादातून मोठा गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि पनवेल परिसरात मराठी विरुद्ध मराठी वाद उफाळून आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे. डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीत येत्या 2 फेब्रुवारीला सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आले होते. परंतु, काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचे फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपशब्द वापरले. त्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे.
advertisement
मराठी कुटुंबाचे आरोप काय?
“सत्यनारायण पूजा व हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठी कुटुंबीयांनी विरोध केला आहे. तसेच आम्हाला शिविगाळ देखील केली असून मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले आहेत,” असं मराठी महिलांनी म्हटलंय. त्यानंतर अमराठी कुटुंबीयांनी मनपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. तसेच अमराठी कुटुंबीयांचे असे प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही, असा इशारा सोसायटीतील मराठी सदस्यांनी दिला आहे.
advertisement
गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, मराठी आणि अमराठी वाद नुकतेच पनवेलमध्येही पाहायला मिळाला होता. त्यानंतर डोंबिवलीत असाच प्रकार घडला आहे. सत्यनारायण पूजेवरून झालेल्या मराठी आणि अमराठी कुटुंबातील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
January 28, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
डोंबिवलीत परप्रातीयांची मुजोरी, मराठी कुटुंबाच्या सत्यनारायण पूजेला विरोध, नेमकं काय घडलं?