Thane Rain: ठाण्यात तुफान पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी, नागरिकांचे प्रचंड हाल, Video

Last Updated:

Thane Rain: राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. ठाणे शहरामधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

+
News18

News18

ठाणे: मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी आहे. मागील 24 तासांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे, तर काही भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ठाणे शहरामधल्या रस्त्यांवर पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या ठिकाणचे मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडथळे येत आहेत.
रात्रीपासून पाऊस बरसत असल्याने चाकरमान्यांची मोठी ससेहोलपट होत आहे. अनेकांची तारांबळ उडत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची कोणतीही बातमी सध्या तरी समोर आलेली नाही. पण पाऊस असाच कोसळत राहिला, तर रेल्वे वाहतुकीवर परिणाम पडण्याची भीती आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून जात असताना बंद पडत आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.
advertisement
वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण
पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पूल, मुलुंड टोलनाका येथे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई-नाशिक महामार्गावरही खारेगाव टोलनाका, साकेत परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुंबईच्या दिशेने निघालेल्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे.
advertisement
रस्त्यांची बिकट अवस्थानागरिकांचे हाल
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहेडोंबिवलीच्या अनेक भागातविशेषतः नवपाडागणेशनगरटिळकनगर रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहेया जोरदार पावसाने मात्र येथील रहिवाशांचे हाल होत आहेत.
advertisement
IMD च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, नाऊकास्ट इशारा मिळाल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यास मदत होईल. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि झाडांखाली किंवा जीर्ण इमारतींखाली थांबणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Rain: ठाण्यात तुफान पाऊस, सगळीकडे पाणीच पाणी, नागरिकांचे प्रचंड हाल, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement