Shahapur News : लाखो प्रवासाचा अनुभव होणार सुखकर; शहापूर आगारात झालेली 'ही' विशेष सुधारणा नेमकी कोणती?

Last Updated:

Shahapur ST Bus : शहापूर आगारातील एसटी बसना आता नवे नावफलक लाभले आहेत. समाजसेवक बबन हरणे यांनी 150 फलक भेट देत प्रवाशांच्या सोयीसाठी हा उपक्रम राबवला आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

News18
News18
ठाणे : "ही बस कुठे जाते हो?" असा प्रश्न आता विचारण्याची गरजच नाही! शहापूर आगारातील एस.टी. बस प्रवाशांना अधिक सोयीस्कर ठरणार आहेत. कारण शहापूर येथील सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शहापूर आगारातील तब्बल 150 एस.टी. बसना गावनिहाय नावफलक भेट दिले आहेत.
पूर्वी शहापूर आगारातून सुटणाऱ्या बस कोणत्या गावाकडे जाते हे ओळखण्यात प्रवाशांना अडचणी येत होत्या. विशेषतहा ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला प्रवासी यांना योग्य बस ओळखणे कठीण जात होते. त्यातून वेळेचा अपव्यय, गोंधळ आणि गैरसमज निर्माण होत होते. या समस्येची दखल घेऊन हरणे यांनी स्वतःच्या खर्चाने प्रत्येक बससाठी आकर्षक, टिकाऊ आणि मोठ्या अक्षरात लिहिलेले नावफलक तयार करून दिले आहेत.
advertisement
या नावफलकांवर संबंधित गावाचे नाव स्पष्टपणे लिहिले असल्याने आता प्रवाशांना आपले ठिकाण सहज ओळखता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून प्रवासाचा अनुभव अधिक सुसह्य आणि सोयीचा ठरेल.
परिवहन खात्याच्या कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. त्यांना आता बसस्टँडवर प्रवाशांच्या चौकशा कमी होणार असल्याने काम सुलभ होईल. तसेच स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गाकडूनही बबन हरणे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. हा उपक्रम केवळ माहिती सोपी करून देणारा नसून ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी केलेले सामाजिक उत्तरदायित्वाचे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Shahapur News : लाखो प्रवासाचा अनुभव होणार सुखकर; शहापूर आगारात झालेली 'ही' विशेष सुधारणा नेमकी कोणती?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement