MHADA Lottery 2025: ठाण्यात म्हाडाचं स्वस्तात घर, तब्बल 14 लाखांचा फायदा, कुणाला संधी?

Last Updated:

MHADA Lottery 2025: म्हाडा कोकण मंडळातील 2000 सालच्या विजेत्यांना 14 लाखांचा फायदा होणार आहे. 156 जणांना स्वस्तात घर मिळणार आहे.

MHADA Lottery 2025: ठाण्यात म्हाडाचं स्वस्तात घर, तब्बल 14 लाखांचा फायदा, कुणाला संधी?
MHADA Lottery 2025: ठाण्यात म्हाडाचं स्वस्तात घर, तब्बल 14 लाखांचा फायदा, कुणाला संधी?
ठाणे: म्हाडा कोकण मंडळाच्या 2000 साली काढलेल्या लॉटरीतील ठाणे चितळसर येथील विजेत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सुमारे 25 वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या 156 विजेत्यांना अखेर घरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सध्या बाजारभावानुसार 50 लाखांची किंमत असलेली घरे आता फक्त 36 लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याचा विचार म्हाडा करत आहे. त्यामुळे प्रत्येक विजेत्याला जवळपास 14 लाख रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे.
2000 साली म्हाडाने अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी चितळसर, ठाणे येथे 200 घरांची लॉटरी जाहीर केली होती. त्यामध्ये 156 अर्जदारांना घरे मंजूर झाली होती. मात्र भूखंडावर असलेल्या आरक्षणामुळे महापालिकेने प्रकल्पास परवानगी नाकारली होती. परिणामी विजेत्यांना घरे मिळाली नाहीत आणि अनामत रक्कमही परत करण्यात आली नव्हती.
advertisement
दरम्यान, म्हाडाने चितळसरमध्ये सुमारे 1,100 नवीन घरे उभारली असून त्यातील काही घरे त्या वेळच्या विजेत्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र सध्याची घरांची किंमत 50 लाखांच्या आसपास असल्याने ती खरेदी करणे विजेत्यांना कठीण जात होते. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हाडाकडे किमती कमी करण्याची मागणी केली होती.
म्हाडाकडून आता 2021 मधील घरांच्या मूळ किंमतीच्या आधारावर (31-32 लाख) आणि किरकोळ व्याज धरून सुमारे 36 लाख रुपयांत घरे देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
MHADA Lottery 2025: ठाण्यात म्हाडाचं स्वस्तात घर, तब्बल 14 लाखांचा फायदा, कुणाला संधी?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement