नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात जलसंकट, या भागात पुरवठा बंद राहणार
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं लागेल. 18 जुलैपासून 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई: ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. 18 आणि 19 जुलै रोजी नवी मुंबईतील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मोरबे मुख्य पाईपलाईनची आवश्यक देखभाल दुरुस्तीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 18 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी 10 ते शनिवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील.
नवी मुंबईच्या मोठ्या भागाला पिण्याचे पाणी पुरवणारी 1700 मिमी व्यासाची मोरबे पाईपलाईन नेरुळ सेक्टर 46 मधील अक्षर बिल्डिंगजवळ पाम बीच रोडवरून जाते. पाईपलाईनच्या या भागात गेल्या काही महिन्यांत वारंवार गळती होत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून पुरवठ्यात व्यत्यय येत आहेत. त्यासाठी एनएमएमसीने सध्याच्य पाईपलाईनच्या बाजूला एक नवीन पाईपलाईन टाकली असून ती आता जोडण्यात येणार आहे.
advertisement
या भागात पाणीपुरवठा बंद
नवी मुंबई महापालिकेकडून पाईपलाईन दुरुस्ती काम हाती घेतले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली तसेच मुख्य पाईपलाईनशी थेट नळ जोडणी असलेल्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच सिडको प्रशासित खारघर आणि कामोठे सारख्या भागातही पाणीपुरवठा खंडित होईल. शुक्रवारी सकाळी 10 वाजलेपासून ते शनिवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा असून कमी दाबाने असेल.
advertisement
दरम्यान, 18 तासांसाठी पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पुढील 3 दिवस पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
July 16, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात जलसंकट, या भागात पुरवठा बंद राहणार