Mumbai Water Cut: ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणीबाणी, कारण काय? कुठं राहणार पाणीपुरवठा बंद?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तरीही काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई: ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. मुलुंड पश्चिम भागात पाईपलाईन दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने 19 जुलै रोजी 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती दिली असून पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन केलंय.
'टी' वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या मुलुंड (पश्चिम) मधील काही भागात शनिवारी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत 12 तास पाणीपुरवठा बंद राहील. अत्यावश्यक पाईपलाईन कामामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली. या काळात मुलुंड (पश्चिम) येथील वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास रस्त्यावर 600 मिमीची नवीन पाणी पाईपलाईन जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 'टी' वॉर्डच्या काही भागांमध्ये नियमित वेळेतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
advertisement
या भागात पाणीपुरवठा बंद
मुलुंड पश्चिमेकडील बाधित भागात मलबार हिल रोड, स्वप्ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाउन रोड, योगी हिल रोड, घाटीपाडा आणि बी.आर. रोड यांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने बाधित भागातील सर्व रहिवाशांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आणि बंद काळात काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर, नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून किमान 3 ते 4 दिवस पाणी वापरण्यापूर्वी फिल्टर करून उकळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये एकत्रित साठा आता 78.30 टक्के आहे. बीएमसी दररोज अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते. मंगळवारी (15 जुलै) या जलाशयांमध्ये एकत्रित पाणीसाठा 11,33,347 दशलक्ष लिटर आहे, जो त्यांच्या एकूण क्षमतेच्या 78.30 टक्के आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 9:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणीबाणी, कारण काय? कुठं राहणार पाणीपुरवठा बंद?