advertisement

MHADA Home : सुवर्णसंधी! मुंबईजवळील या भागात रेल्वे स्टेशन लगतच म्हाडाचे हक्काचे घर फक्त 15 लाखांत; लगेच करा अर्ज

Last Updated:

Mhada Housing Project : कल्याण आणि डोंबिवली शहराच्या स्टेशनजवळील परिसरात म्हाडाचा नवीन आणि भव्य घरकुल प्रकल्प सुरू झाला आहे. येथे 1 आणि 2 BHK घरे फक्त 15 लाखांपासून उपलब्ध आहेत. स्टेशन, बाजार, शाळा, हॉस्पिटल जवळ असल्यामुळे लहान कुटुंबांसाठी ही उत्तम संधी आहे.

News18
News18
कल्याण : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे. मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या भागात त्यातही अगदी रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे घर आता कमी दरात उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया म्हाडाच्या या संपूर्ण प्रकल्पाबद्दल आणि कसा अर्ज करता येईल.
कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रकल्प
कल्याण-डोंबिवली परिसरात म्हाडाचा नवीन प्रकल्प सुरू झाला आहे. येथे साधारण 1 BHK आणि 2 BHK घरे फक्त 15 लाखांपासून उपलब्ध आहेत. या प्रकल्पात आधुनिक राहणीमानासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा आहेत शिवाय तात्काळ राहण्यासाठी तयार घरांमुळे खरेदीदारांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
स्टेशनजवळ अगदी जवळ असा हा प्रकल्प
घर घेताना सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. कारण घरा जवळच्या सुविधा आणि प्रवास सोपा असल्यास जीवन जास्त आरामदायी होतं. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत एक खास संधी आली आहे. रेल्वे स्टेशनजवळ फक्त 15 लाखात हे म्हाडाचे घर आहे. स्टेशनपासून जवळ असलेली ही घरे ऑफिस जाणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि लहान कुटुंबांसाठी परफेक्ट आहेत. आसपास बाजारपेठा, शाळा, हॉस्पिटल आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे उत्तम सुविधा आणि परवडणारी किंमत दोन्ही मिळणार आहेत. अशा ठिकाणी घर मिळणं ही खरोखरच सुवर्णसंधी आहे.
advertisement
लोकेशन
हा प्रकल्प कल्याण–डोंबिवली परिसरातील शिरढोण भागात आहे. हा परिसर सध्या मुंबईतील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक आहे. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, वाढती सोयीसुविधा आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरमुळे हा भाग आता घरखरेदीदारांचा नवा हॉटस्पॉट बनत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
MHADA Home : सुवर्णसंधी! मुंबईजवळील या भागात रेल्वे स्टेशन लगतच म्हाडाचे हक्काचे घर फक्त 15 लाखांत; लगेच करा अर्ज
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement