Diwali 2025: घरगुती आणि पारंपारिक! भिवंडीमध्ये 'या' ठिकाणी मिळतो खमंग- खुसखुशीत फराळ
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Diwali 2025: भिवंडी मध्ये राहणाऱ्या अश्विनी सानप या महिलेला स्वयंपाकामध्ये आवड असल्याने आज त्याच स्वयंपाकाची चव विदेशात जाऊन पोहोचली आहे. सानप यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू केलेले घरगुती फराळ आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या फराळाला मागणी वाढली आहे.
फराळाशिवाय अपूर्ण असलेली दिवाळी, नेहमीच फराळ आणि खमंग पदार्थ बनविण्याचा वास आला की दिवाळी आली अशी कन्सेप्ट आहे. परंतु अशाच एका भिवंडी मध्ये राहणाऱ्या अश्विनी सानप या महिलेला स्वयंपाकामध्ये आवड असल्याने आज त्याच स्वयंपाकाची चव विदेशात जाऊन पोहोचली आहे. सानप यांनी गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू केलेले घरगुती फराळ आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या फराळाला मागणी वाढली आहे.
फराळामध्ये बेसन लाडू, भाजणी चकली, शेव, शंकरपाळी गोड आणि खारड, गुळाची करंजी, साखर करंजी, ड्रायफ्रूड बार असे विविध प्रकारचे फराळ आहेत जे त्या पारंपरिक आणि घरगुती पद्धतीत शुद्ध तूप तेल वापरून बनवत असल्याने त्यांच्या या फराळाला महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर जसे लंडन, दुबई, युके सारख्या देशात ही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे. दरवर्षी त्या नवनवीन पदार्थ ॲड करत असतात त्यामुळे ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद चांगला मिळतो.
advertisement
सुरुवातीला सानप दिवाळीसाठी फराळ हा नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना देण्यासाठी बनवत असत. त्यांची फराळ बनविण्याची पद्धत आणि प्रत्येक पदार्थातील टेस्ट पाहता त्याच लोकांनी सानप यांना या व्यवसायात प्रोत्साहित केले. गणपतीच्या मोदकांपासून त्यांच्या या पदार्थांची मार्केटिंग सुरू झाली. एक महिला असून तिची चव विदेशात जाऊन पोहोचली. त्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी आणि कुटुंब मित्रपरिवार यांची साथ असेल तर प्रत्येक महिलेला सगळच पॉसिबल आहे हे अश्विनी सानप यांनी कळून दिले आहे.
advertisement
आज त्यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या 10 ते 12 महिलांना सानप यांच्यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. अश्विनी सानप यांनी महिलांना स्वतःच्या हाताला असलेली चव बनविण्याची पद्धत किंवा महिलांमध्ये असलेली कला ही फक्त 4 भिंतीच्या आत न ठेवता बाहेर ही ती कला सादर करण्याचा प्रयत्न करा असे दाखवून दिले आहे. फराळांमध्ये त्या प्रॉफिड काढतात पण ते फराळ बनविण्यासाठी लागणारी मेहनत आणि ग्राहकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मुख्य उद्देश लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्यांचा फराळ आवडीने खातात हाच मिळणारा समाधान त्यांचा एक प्रकारे बोनसच आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही ही त्याचा फराळ हा 1000 किलोच्या वर गेला असल्याचं सानप यांनी सांगितले.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 18, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali 2025: घरगुती आणि पारंपारिक! भिवंडीमध्ये 'या' ठिकाणी मिळतो खमंग- खुसखुशीत फराळ