'बाबांचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही' मंगेश काळोखेंच्या लेकी पहिल्यांदा बोलल्या, त्या दिवशी घडलेलं संगळं सांगितलं

Last Updated:

हत्येला आठ दिवस झाले. फिर्यादीमधील काही आरोपी यांना अटक होणं बाकी आहे. त्यांना अटक करावी आणि फाशी द्यावी, अशी मागणी मंगेश यांच्या कुटुंबीयांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

मंगेश काळोखे हत्या प्रकरण
मंगेश काळोखे हत्या प्रकरण
संतोष दळवी, प्रतिनिधी
खोपोली : "बाबांचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही, त्यांची काय चुकी होती. रुग्णालयातून आणलं त्यांना तेव्हाही कापडातच होते. शेवटचा चेहरा सुद्धा आम्हाला बघता आला नाही. माझ्या बाबांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे" अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या मुलींनी केली. मुलींची ही मागणी ऐकून उपस्थितीत लोकांच्या डोळ्यात पाणी आलं.
खोपोली येथील नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज शुक्रवारी या हत्येला आठ दिवस झाले. फिर्यादीमधील काही आरोपी यांना अटक होणं बाकी आहे. त्यांना अटक करावी आणि फाशी द्यावी, अशी मागणी मंगेश यांच्या कुटुंबीयांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
advertisement
मयत मंगेश काळोखे यांनी  छोटी मुलगी आर्या सातवीला आहे  तर मोठी मुलगी वैष्णवी ही दहावीला आहे. या दोन्ही मुली आज आपल्या बाबांच्या निर्घृण हत्येनंतर भयभीत झालेल्या दिसल्या. साईबाबा नगरमध्ये भीतीचे वातावरण आहे.
'आर्याला सोडायला गेले होते शाळेत' 
आर्या या छोट्या मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना जयाबार समोर मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली होती. "माझे बाबा मला शाळेत सोडायला गेले होते. पण, नंतर ते दिसले नाही. मला बाय केलं आणि निघून गेले. पण, आता ते परत कधी आालेच नाही. माझ्या बाबांना मारणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी आर्याने केली.
advertisement
'पोलिसांनी कारवाई केली असती तर काका वाचले असते'
'आम्ही काही स्टेट्स ठेवले होते, त्यावरून वाद झाला होता. मला बोलून घेतलं होतं, त्याच्यावरून मी माफी मागितली होती. आम्ही अशी तक्रार दिली होती. विशाल देशमुख आणि सुशाल देशमुख हे दोन आरोपींना आता अटक झाली आहे. त्यांच्या घरी शस्त्र आणले होते, हे आम्ही पोलिसांना सांगितलं होतं. खोपीली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पण त्यांनी कोणती कारवाई केली नाही. जर पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर मंगेश काळोखे यांच्या जीवाला काही झालं नसतं, असं मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या आणि फिर्यादी राज काळोखे याने सांगितलं.
advertisement
तसंच, "जे काही आरोपी अटक होणे बाकी आहे त्यांना पकडून लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा करावी. 26 तारखेला पोलिसांनी भेटायला बोलावलं होतं. विजयानंतर आम्ही सोशल मीडियावर स्टेट्स ठेवले होते. त्याचे फोटो पोलिसांनी घेतले. त्या व्यतिरिक्त काही घेतलं नाही. या हत्येत सुधाकर घारे आणि भरत भगत यांचाही सहभाग असल्याचा आरोप राज काळोखे याने केला.
advertisement
आतापर्यंत ९ जणांना अटक
खोपोलीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मंगेश काळोखे हे खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. शहरातील जया बार समोर ५ जणांनी काळोखे यांचा पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने जवळपास २४ ते २७ वार हल्लेखोरांनी केले होते. या भयानक हल्ल्यात काळोखेंचा जागेवरच मृत्यू झाला. मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांच्यासह ९ जणांवर गुन्हे दाखल आहे. या हत्येतील एकूण 9 आरोपींना पोलिसांनी  ताब्यात घेतलं असून तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बाबांचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही' मंगेश काळोखेंच्या लेकी पहिल्यांदा बोलल्या, त्या दिवशी घडलेलं संगळं सांगितलं
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement