Panvel: पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई, एका महिलेकडे सापडलं तब्बल 35 कोटींचं ड्रग्स
- Published by:Sachin S
Last Updated:
याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.
विनय म्हात्रे, प्रतिनिधी
पनवेल: मुंबईजवळील पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पनवेल रेल्वे स्थानकावरस्थानकावर बंगळुर येथील नारकोटिक्स नियंत्रण विभागाने (NCB) केलेल्या धाडसी कारवाईत करीत ३५ कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहेत. साडेतीन किलो वजनाचे ड्रग्स असून या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे.
बंगळुरू एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पनवेल रेल्वे स्थानकावर छापा टाकून त्यांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. या ड्रग्सची किंमत तब्बल ३५ कोटी असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आल्याची ही पहिलीच कारवाई असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
पनवेल रेल्वे पोलिसांच्या मदतीने पनवेल रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पनवेल रेल्वे पोलीस आणि बंगळुरू नारकोटिक्स नियंत्रण विभागाने स्टेशनवर सापळा रचला. एक नायजेरियन महिला ही मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. एनसीबीच्या अधिकारी आणि पोलिसांनी आरोपी नायजेरियन महिला प्रवास करताना पनवेल स्टेशनवर पकडलं. या महिलेला खाली उतरवण्यात आलं, त्यानंतर तपासणी केली असता ड्रग्सचाा साठा सापडला. या महिलेकडून जप्त करण्यात आलेले मेथा नामक ड्रग्ज सध्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले आहेत. यामागील रॅकेट कोणते आहे, कोणत्या टोळीशी याचा संबंध आहे याबाबत बंगळुर एनसीबी आणि रेल्वे पोलीस संयुक्तरीत्या तपास करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे.
Location :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
July 18, 2025 11:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panvel: पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई, एका महिलेकडे सापडलं तब्बल 35 कोटींचं ड्रग्स