TMC Bharti 2025: ठाणे महानगर पालिकेत आरोग्य विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंत्राटी पद्धतीने होतेय नोकरभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Thane Municipal Corporation Bharti 2025: ठाणे महानगर पालिकेमध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती निघाली आहे. यामध्ये एकूण 140 जागांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे.
ठाणे महानगर पालिकेमध्ये राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत भरती निघाली आहे. यामध्ये एकूण 140 जागांसाठी ही नोकरभरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी 16 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. उमेदवारांना भरतीसाठी BSc (Nursing) किंवा GNM कोर्स, ANM कोर्स अशी शैक्षणिक पात्रता आहे. जर तुमच्याकडे जाहिरातीमध्ये दिलेल्या शैक्षणिक पात्रता असतील तर तुम्ही अर्ज भरू शकणार आहेत.
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची सुरुवात 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत आणि 15 व्या वित्त आयोग अंतर्गत कंत्राटीपद्धतीने नोकरभरती होत आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्जाची लिंक बातमीमध्ये दिली जात आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत होत असलेल्या नोकरभरतीसाठीची गुगल फॉर्मची लिंक अस्तित्वात नाही. परंतू 15 व्या वित्त आयोग अंतर्गत कंत्राटीपद्धतीने होत असलेल्या नोकरभरतीसाठीच्या गुगल फॉर्मची लिंक सुरू आहे.
advertisement
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfUQM7IWvVqudVY_Vr8EWXGJdnKy---3mTSqUYhK5GDC8IZmA/viewform या लिंकवर क्लिक करून अर्जदार अर्ज करू शकणार आहेत. अर्जामध्ये दिलेली माहिती भरून तुम्ही अर्ज भरू शकता. शैक्षणिक अर्हते बाबतचा सविस्तर आणि अचूक माहिती अर्जामध्ये भरावा. कारण की, अर्जदारांची अर्जामध्ये नमूद माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 20,000 रुपयांपर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदारांचे किमान वय 18 वय असावे आणि कमाल वय 38 वर्षे पूर्ण असावे, अशी वयोमर्यादा आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 21, 2025 4:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
TMC Bharti 2025: ठाणे महानगर पालिकेत आरोग्य विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंत्राटी पद्धतीने होतेय नोकरभरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया