तुम्ही जे टोमॅटो खाताय ते कचऱ्यातून तर आले नाही ना? मुंबईतला VIDEO व्हायरल
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
टोमॅटोचे दर एकीकडे वाढत असताना आता मुंबईच्या दादर परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथे काही लोक चक्क कचऱ्यातून सडलेला टोमॅटो उचलून विक्रीसाठी आणताना दिसत आहेत.
मुंबई:
पावसामुळे देशभरात भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक कमी झाली आहे. टोमॅटोचे नवी मुंबई, मुंबई या शहरात दर शंभरीपार गेल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या दादर परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दादर पश्चिम येथीलल मार्केटमध्ये कचऱ्यातून वेचून सडलेले टोमॅटो विकले जात असल्याचं दिसत आहे.
advertisement
नेमकी घटना काय?
पावसाळा सुरू होताच टोमॅटोच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. टोमॅटोचे दर शंभरी पार पोहोचले आहेत, आता टोमॅटो गतवर्षीचे रेकॉर्ड्स मोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यातील नवी मुंबईमध्ये टोमॅटोचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर 70 ते 80 रूपयांवर होते. आता आवक कमी असणाऱ्या बाजार समित्यांमध्ये शंभर किंवा त्याहून अधिक दर मिळत आहे. मुंबईत सगळ्या भाज्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत.
advertisement
अशा परिस्थितीत दर वाढलेले असून दादर पश्चिम येतील मार्केटमध्ये कचऱ्यातून वेचून आणलेले सडलेले टोमॅटो विकले जात आहेत. टोमॅटो महाग झाले असून मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे, असं असताना मोठी काटकसर करत लोक खरेदी करतात. अशा परिस्थितीमध्ये जर भाजी विक्रेते लोकांच्या जीवाशी खेळ करत असतील, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
advertisement
टोमॅटो 160 पर्यंत पोहोचणार?
गतवर्षी टोमॅटोचे दर 200 ते 250 रूपयांपर्यंत गेल्याचं आपण पाहिलं होते. तशीच काहीशी परिस्थिती यंदा देखील राज्यात आणि देशात निर्माण होवू शकतो. त्यामुळे बळीराजाला नक्कीच दिलासा मिळणार आहे.जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी भारतीय लोक सातत्याने आहारात टोमॅटोचा वापर करत असतात. टोमॅटोविना भारतीय गृहिणींची रेसीपी पूर्ण होत नाही.आगामी काही दिवसांत पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास नवी मुंबई बाजार समितीत टोमॅटोचे दर 160 रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
advertisement
मुंबईतील दादर पश्चिम इथल्या मार्केटमध्ये चक्क कचऱ्यातून वेचले जात आहे टोमॅटो, व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/A2WEp1fMHc
— News18Lokmat (@News18lokmat) July 23, 2024
या वाढत्या दरामुळे शहरी भागातील गृहिणींचं बजेट काहीसं कोलमडू शकतं. त्यामुळे आता कांदा नव्हे तर टोमॅटो गृहिणींना बजेट राखताना काटकसर करायला भाग पाडणार आहे.दुसरीकडे सतत नानाविध संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 7:32 PM IST


