Dharashiv Tuljapur : तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीचं चांगभल! जामिनावर बाहेर, भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी
- Reported by:BALAJI NIRFAL
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Tuljapur Local Body Election : राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.
धाराशिव: राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. आरोपी विनोद गंगणे याने भाजपात काही दिवसांपूर्वीच पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर आता थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता विरोधक आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.
तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का आणि तितकाच वाद निर्माण करणारा निर्णय समोर आला आहे. ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांना अखेर भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजप नेतृत्वाचा आदेश टाळला?
भाजप पक्षश्रेष्ठींकडून महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज यांना उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी पिटू गंगणे यांनाच उमेदवारी दिल्याचं समजतं. या ‘पॉवर प्ले’मुळे तुळजापूरमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
advertisement
पिटू गंगणे सध्या ड्रग्स प्रकरणात जेलमधून जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीस उमेदवारी देणं योग्य का? असा प्रश्न विरोधकांनी तीव्रतेने उपस्थित केला आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही या प्रकरणावरून आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधक आणखीच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या या निर्णयाने आता तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसापुर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर झाली टीका होती.
advertisement
प्रकरण काय?
एप्रिल 2025 मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तुळजापुरातील तामलवाडी येथून एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला होता. पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली. या प्रकरणी तुळजापूर मंदिरातील १३ पुजारींचा ड्रग्स तस्करीत सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर काही राजकीय लागेबंध असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती.
Location :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
Nov 19, 2025 9:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv Tuljapur : तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीचं चांगभल! जामिनावर बाहेर, भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी










