Tuljapur Drugs Case: धाराशिवचं राजकारण तापलं! तुळजापूर अमली पदार्थ प्रकरण आरोपीचा भाजप प्रवेश, विरोधकांचा हल्लाबोल
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:Pritam Pandit
Last Updated:
Tuljapur Drugs Case: गाजलेल्या तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तुळजापूर : राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील संशयित आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या उपस्थितीत या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर विरोधकांकडून भाजपवर तीव्र टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच प्रवेशावरून आता भाजपवर जोरदार टीका केली. -सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत कारवाई करण्याची केली विनंती. - लोकशाहीत पक्ष संघटना वाढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र ड्रग्स प्रकरणात आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला माहिती नसावी यासाठी हे पत्र लिहीत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
advertisement
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर हा जामिनावर सध्या बाहेर आहे. तुळजापूर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना संतोष परमेश्वर यांनी तुळजापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं. तर, विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना संतोष परमेश्वरांनी साथ दिली होती.
advertisement
त्यानंतर आता नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याने पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये ड्रग्जचा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही तीव्र शब्दांत भाजपवर हल्लाबोल केला. “तुळजापूर शहराला बदनाम करणारे आणि तरुण पिढीचा नाश करणारे लोक आता भाजपच्या छत्राखाली गेले आहेत. हे तुळजापूरकरांनी लक्षात ठेवा, यांना आता मतदानातून धडा शिकवण्याचे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले. भाजपाचं चाल चरित्र आणि ड्रग्स माफीया यांना कोणी पाठीशी घातलं असा सवाल करताना या सगळ्या प्रकरणात खरे सूत्रधार आमदार राणा जगजित सिंह पाटील असल्याचा आरोप त्यांनी केला.
view commentsLocation :
Tuljapur,Osmanabad,Maharashtra
First Published :
November 12, 2025 2:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tuljapur Drugs Case: धाराशिवचं राजकारण तापलं! तुळजापूर अमली पदार्थ प्रकरण आरोपीचा भाजप प्रवेश, विरोधकांचा हल्लाबोल


