मित्रासाठी लावली जीवाची बाजी, नागपुरात फिरायला गेलेल्या 2 जिगरी दोस्तांचा दुर्दैवी अंत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं फिरायला गेलेल्या कॉलेजच्या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं फिरायला गेलेल्या कॉलेजच्या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित दोन तरुण आपल्या इतर सहा मित्रांसोबत नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी तलाव परिसरात फिरायला गेले होते. मात्र यातील चारच मित्र जिवंत परतले. तर दोन जिगरी मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. दोन कॉलेजच्या मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अविनाश आनंद आणि संकल्प मालवे अशी मृत पावलेल्या दोन मित्रांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण त्यांच्या इतर सहा मित्रांसोबत भागीमहारी तलाव परिसरात फिरायला गेले होते. फिरत असताना, काही मित्रांनी तलावाच्या पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. अविनाश आनंद (वय २०) हा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा त्याला अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
advertisement
मित्राला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र संकल्प मालवे (वय अंदाजे १८) याने क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी घेतली. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात संकल्पनेही आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मात्र, या दोघांनाही तलावातील पाण्याची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अजिबात अंदाज आला नाही आणि दोघेही पाण्यात बुडाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
मृत अविनाश आनंद हा प्रियदर्शिनी महाविद्यालयात बी.ई. (अभियांत्रिकी) तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. तर, संकल्प मालवे हा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचा विद्यार्थी होता. दोन्ही तरुणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
November 06, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मित्रासाठी लावली जीवाची बाजी, नागपुरात फिरायला गेलेल्या 2 जिगरी दोस्तांचा दुर्दैवी अंत


