Wardha News : वर्ध्याच्या हिंगणघाटात दोन गटात तुफान राडा,वाद सोडवायला गेलेल्या पोलिसावर तलवारीने सपासप वार, धक्कादायक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत हिंगणघाट इथं दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात तुफान वाद झाला होता.
Wardha News : नरेंद्र मते, प्रतिनिधी : वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत हिंगणघाट इथं दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटात तुफान वाद झाला होता. हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनूसार, वर्ध्याच्या हिंगणघाट येथील कारंजा चौकात दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जनादरम्यान दोन गटात चांगलाच वाद झाला होता. हा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसावरच तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झालाय.
advertisement
खरं तर मूर्ती विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडलाय. दोन्ही गट आमने सामने आले. सुरुवातीला बाचाबाची झाली.त्यानंतक वाद वाढतच गेला. हा वाद सोडविण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होती. पण हिंगणघाट शहरातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या दोघांनी धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला चढवला होता.या हल्ल्यात पोलिसांच्या हातावर तलवारीने गंभीर वार करण्यात आले होते.त्यामुळे पोलीस गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांवरच हल्ला चढवल्याचे पाहता विशाल उर्फ वाढरू कुळमते आणि रामदास वाटणकर या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 04, 2025 11:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha News : वर्ध्याच्या हिंगणघाटात दोन गटात तुफान राडा,वाद सोडवायला गेलेल्या पोलिसावर तलवारीने सपासप वार, धक्कादायक घटना