कार्यकर्त्यांनी दिलेलं बर्थडे सरप्राईज, उदयनराजे भारावले; म्हणाले, 'मला जाऊ द्या ना घरी...'

Last Updated:

वाढदिवसानिमित्ताने खास एक स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान भलामोठा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

 उदयनराजे
उदयनराजे
सचिन जाधव, सातारा : खासदार उदनयराजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा केला जात आहे. दरवर्षी त्यांचा वाढदिवस समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने खास एक स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान भलामोठा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.
वाढदिवसाच्या निमीत्त भरवण्यात आलेल्या शाहु स्टेडीयम येथील कै प्रतापसिंह महाराज चषकाच्या ठिकाणी भला मोठा केक कापून आणि फटाके फोडून वाढदिवस साजरा करण्यात आला. उदयनराजे यांना कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली ही तलवार राजेंनी स्वत: च्या स्टाईल मध्ये म्यानातून बाहेर काढत उपस्थितांची मनं जिंकली.
advertisement
उदयनराजे यांनी ' मला जाऊद्याना घरी वाजले की बारा' असं उपस्थितांना म्हणताच याठिकाणी एकच जल्लोष झाला. खासदार उदयनराजे त्यांच्या हटके स्टाईलसाठी आणि त्यांच्या डायलॉगसाठी प्रसिद्ध आहेत. कधी साउथ स्टाईल तर कधी गोगलची स्टाईल तर कधी गाडी चालवताना मारलेला हटके डायलॉग यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
यावेळी उदयनराजे यांनी कार्यकर्ते आणि खेळाडूंशी संवाद साधला. त्यांनी पराभूत झालेल्यांना आपल्या डायलॉगने बळ दिलं आणि त्यानंतर कार्यकर्ते आणि खेळाडूंनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कार्यकर्त्यांनी दिलेलं बर्थडे सरप्राईज, उदयनराजे भारावले; म्हणाले, 'मला जाऊ द्या ना घरी...'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement