Uddhav Thackeray : 'शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी द्या', उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांकडे दोन मोठ्या मागण्या! म्हणाले 'हात जोडून विनंती करतो...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Uddhav Thackeray On Maharastra Farmers : शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी द्या. शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. तसेच व्याज देणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवू नका, असा आदेश द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Uddhav Thackeray Press Conference : मराठवाड्यात शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी आलेली आपत्ती भयानक भीषण आहे. मराठवाड्यात आत्ताही पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचा नव्हे सगळ्यांचा घास हिरावून घेतला गेला आहे. संकटात शेतकऱ्यांवर कर्जाच् ओझं आहे. शेतकऱ्याला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं, सरकारने भरपाई द्यायला हवी. जमीन सावरायची झाली, तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील. रोज आत्महत्यांच्या बातम्या येता आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्या
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भीषण परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या शेतात काहीही राहिलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी द्या. शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी. तसेच व्याज देणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवू नका, असा आदेश देखील द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. पंजाब सरकारने हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर केली, तशी मदत करावी, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
advertisement
निवडणुका नाही म्हणून वाऱ्यावर सोडता का?
75 लाख महिलाना बिहारमध्ये 10 हजार खात्यात टाकता, महाराष्ट्राने तुम्हाला भर भरून मदत केली, त्या मतदारांना इथे निवडणुका नाही म्हणून वाऱ्यावर सोडता का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बँकांच्या शेतकऱ्यांना जाणाऱ्या नोटीस थांबवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजपला अंगलट आल्यावर फाटा फोडायची सवय आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी तेव्हा पीएम केअर फंडात तेव्हा दिले होते. PM केअर फंडमधून महाराष्ट्राला 50 हजार कोटी तरी द्यावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'शेतकऱ्यांना 50000 रुपये हेक्टरी द्या', उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्र्यांकडे दोन मोठ्या मागण्या! म्हणाले 'हात जोडून विनंती करतो...'