Marathi Melava : विजयी मेळाव्यात सरप्राइज एन्ट्री, शेवटच्या क्षणी मोठा बदल, समोर आली अपडेट

Last Updated:

Marathi Vijayi Melava : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसह सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

आजच्या विजयी मेळाव्यात सरप्राइज एन्ट्री, शेवटच्या क्षणी मोठा बदल
आजच्या विजयी मेळाव्यात सरप्राइज एन्ट्री, शेवटच्या क्षणी मोठा बदल
प्रणाली कापसे, प्रतिनिधी, मुंबई: त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसह सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे.
आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या मेळाव्याची सुरुवात होणार आहे. आजच्या मेळाव्यात राज्यातील विविध राजकीय पक्षांनादेखील उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. मात्र, आता महाविकास आघाडीतील किती राजकीय पक्ष यावेळी उपस्थित राहणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
advertisement

शरद पवार आज अनुपस्थिती मेळाव्यात सरप्राइज एन्ट्री...

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवार यांनी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली. शरद पवार यांच्या अनुपस्थित राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील असे म्हटले जात होते.
advertisement
आजच्या मेळाव्यात मात्र एक सरप्राइज एन्ट्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या विजयी मेळाव्याला हजर राहणार आहेत. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांचेदेखील भाषण होण्याची शक्यता आहे. या विजयी मेळाव्यात प्रत्येक पक्षाकडून एक नेता भाषण करणार आहे. सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार असून, त्याआधी राज ठाकरे यांचे भाषण होणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi Melava : विजयी मेळाव्यात सरप्राइज एन्ट्री, शेवटच्या क्षणी मोठा बदल, समोर आली अपडेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement