Marathi Melava : वरळी डोम सभागृह खचाखच भरलं, गेटवर प्रचंड गर्दी, नेतेही अडकले, पोलिसांसोबत बाचाबाची
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Marathi Melava : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेतेदेखील या गर्दीत अडकले आहेत. पोलिसांकडून अटकाव केला जात असून काहीशी तणावाची स्थिती आहे.
मुंबई: त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. सभागृह खचाखच भरले असून प्रवेशद्वाराजवळही मोठी गर्दी आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नेतेदेखील या गर्दीत अडकले आहेत. पोलिसांकडून अटकाव केला जात असून काहीशी तणावाची स्थिती आहे.
आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही वेळेतच मेळाव्याची सुरुवात होणार आहे. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत.
प्रवेशद्वारावर पोलिसांशी हुज्जत, बाचाबाची...
आजच्या या विजयी मेळाव्यासाठी हजर राहण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. मात्र, गेटवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सभागृहात प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे, मनसे नेते प्रकाश महाजन आदींसह महत्त्वाचे नेते गर्दीत अडकले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गेटवर जात कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
advertisement
इतर संबंधित बातमी:
'मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा…' राज बद्दल मवाळ पण भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार, विचारले 3 प्रश्न
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi Melava : वरळी डोम सभागृह खचाखच भरलं, गेटवर प्रचंड गर्दी, नेतेही अडकले, पोलिसांसोबत बाचाबाची