Marathi Melava : 'मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा…' राज बद्दल मवाळ पण भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार, विचारले 3 प्रश्न

Last Updated:

BJP On Marathi Melava : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. तर, भाजपकडून मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंविरोधात तोफ डागली असताना दुसरीकडे राज यांच्याबाबत मवाळ धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.

'मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा…' राज बद्दल मवाळ पण भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार, विचारले 3 प्रश्न
'मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा…' राज बद्दल मवाळ पण भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार, विचारले 3 प्रश्न
मुंबई : त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील NSCI डोममध्ये हा विजयी मेळावा होत आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. तर, भाजपकडून मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंविरोधात तोफ डागली असताना दुसरीकडे राज यांच्याबाबत मवाळ धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.
आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. काही वेळेतच मेळाव्याची सुरुवात होणार आहे. आजच्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. तर, राजकारणही तापण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement

भाजपचा बोचरा सवाल...

भाजपने आजच्या मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. आज म्हणे मराठी साठी दोन भाऊ एकत्र येणार, जल्लोष करणार..खरं तर मराठीसाठी हे एकत्र येत नाहीत तर पुन्हा मुंबई महापालिकेची सोन्याची अंडी देणारी कोंबडी हवी आहे त्यासाठीच केवळ ही धडपड सुरू असल्याची बोचरी टीका भाजपने केली आहे.

भाजपचे तीन सवाल...

advertisement
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठीचा कैवारी असल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे किमान ३ प्रश्नांची उत्तरे आज मेळाव्यात देतील का? असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

>> भाजपचे तीन सवाल कोणते?

advertisement
वर्षानुवर्षे महापालिकेत सत्तेवर असताना किती मराठी कंत्राटदारांना कंत्राटे दिली व किती अमराठी कंत्राटदारांच्या झोळ्या भरल्या?
> महापालिकेच्या 21 मराठी शाळांना सीबीएसईने अभ्यासक्रम लावून तिथे मराठी तिसरी भाषा करण्यात आली त्यावेळी मराठी बाणा कुठे गेला?
> उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा माशेलकर समितीचा फेटाळण्याऐवजी स्वीकारला का?
या तीन प्रश्नांची उत्तरे द्या मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा, असे आव्हान उपाध्ये यांनी दिले आहे.
advertisement

इतर संबंधित बातमी:

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi Melava : 'मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा…' राज बद्दल मवाळ पण भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार, विचारले 3 प्रश्न
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement