आईच्या खानावळीपासून क्लाऊड किचनपर्यंत; कॉर्पोरेट नोकरी सोडून ‘पोटभर किचन’ची सुरुवात
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
पूजा खैरे हिने दहा वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर आपल्या आई वसंती खैरे यांच्या जुन्या खानावळीला आधुनिक स्वरूप देत ‘पोटभर किचन’ या नावाने क्लाऊड किचन सुरू केले.
मुंबई : सध्या अनेक तरुणाई नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाकडे वळत आहे. त्याच प्रवाहात ग्रँट रोड परिसरातील पूजा खैरे हिने दहा वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर आपल्या आई वसंती खैरे यांच्या जुन्या खानावळीला आधुनिक स्वरूप देत ‘पोटभर किचन’ या नावाने क्लाऊड किचन सुरू केले. आई वसंती खैरे यांच्याकडे खानावळी चालवण्याचा अनुभव होता, तसेच त्यांनी घरगुती मराठी शिकवण्याचे क्लासेस घेतले आणि घरोघरी जाऊन नर्सरीसंबंधी कामे केली, तसेच घरगुती डबे बनवण्याचं कामही चालवत होत्या. या अनुभवातून आणि आपल्या स्वतःच्या कॉर्पोरेट सेव्हिंग्जचा उपयोग करून पूजाने हा व्यवसाय सुरू केला.
कॉर्पोरेटमधून व्यवसायाकडे प्रवास
पूजा खैरेने दहा वर्षे कॉर्पोरेटमध्ये विविध पदांवर काम केले. चांगला पगार आणि सुरक्षित करिअर असूनही तिला स्वतःचं काहीतरी करावं असं वाटत राहिलं. शेवटी तिने नोकरीचा राजीनामा दिला. आपल्या सेव्हिंग्जचा उपयोग करून, कोणाकडूनही कर्ज किंवा गुंतवणूक न घेता तिने आईसोबत व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
घरगुती मसाल्यांचा खास स्वाद
पोटभर किचन’ची सुरुवात मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात झाली. येथेच आई-मुलगी मिळून पहिल्यांदा ग्राहकांसाठी घरगुती जेवण बनवू लागल्या. घरची चव आणि स्वच्छतेवर भर असल्यामुळे लोक हळूहळू या किचनकडे आकर्षित झाले. पोटभर किचन’मधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे घरगुती मसाले. कोणतेही आर्टिफिशियल कलर किंवा रेडीमेड मसाले न वापरता, आईच्या हाताने बनवलेले मसाले पदार्थांना वेगळीच चव देतात. सावजी मटण – सर्वात हिट डिश , विविध मच्छीच्या रेसिपीज इतर खास नॉनव्हेज पदार्थ हे इथले स्पेशल पदार्थ आहेत.
advertisement
घरगुती चवीला जपण्यावर भर देत, आई-मुलगी मिळून क्लाऊड किचन चालवत आहेत. या प्रकारे त्यांनी जुन्या खानावळीचा अनुभव आधुनिक क्लाऊड किचनमध्ये रूपांतरित केला आहे आणि तीन महिन्यांत व्यवसाय चालू ठेवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 6:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आईच्या खानावळीपासून क्लाऊड किचनपर्यंत; कॉर्पोरेट नोकरी सोडून ‘पोटभर किचन’ची सुरुवात