10वी -12वी च्या बोर्डाच्या परीक्षेत होणार मोठा बदल, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
10th- 12th Exam News : दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी हिंदी विषयाचा पेपर घेतला जायचा. पण आता नवीन नियमाप्रमाणे, माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी भाषेच्या पेपरच्या ऐवजी सोप्पा विषयाचा पेपर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दहावी- बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये होणाऱ्या परिक्षांबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. परिक्षेच्या पहिल्या पेपरसंबंधित बोर्डाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पेपरच्या क्रमामध्ये बदल केलेला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहावी- बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या पहिल्या दिवशी हिंदी विषयाचा पेपर घेतला जायचा. पण आता नवीन नियमाप्रमाणे, माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी भाषेच्या पेपरच्या ऐवजी सोप्पा विषयाचा पेपर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषेचा पहिलाच पेपर असल्याने अनेक विद्यार्थ्यांवर पेपर दरम्यानच मानसिक दबाव यायचा. परिक्षेच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थी चिंतेत राहायचे, यामुळेच बोर्डाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असा निर्णय बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
advertisement
पहिला पेपरच जर हिंदीसारखा मुख्य विषय असेल तर ताण वाढतो आणि त्याचा परिणाम पुढील पेपरांवर दिसून येतो. याच कारणामुळे अनेक विद्यार्थी हिंदीत नापास होतात. हिंदी भाषेमध्ये नापास होणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या बदलामुळे विद्यार्थी पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या वातावरणाशी सहज जुळवून घेतील अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंदी हा विषय गुण मिळवण्यासाठी सोपा मानला जातो. तरीही पहिल्याच दिवशी हा पेपर असल्याने विद्यार्थी घाबरतात आणि अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळवतात. या बदलामुळे विद्यार्थी पहिल्या दिवशी सोपा विषय घेऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही महिन्यांतच दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या जातील. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण कमी व्हावा आणि ते उत्तमरीत्या तयारी करू शकावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. हा निर्णय महाराष्ट्र बोर्डाचा नसून उत्तर प्रदेश बोर्डाचा आहे. उत्तर प्रदेश बोर्डाने दिलेल्या निर्णय विद्यार्थ्यांसाठी दिलासा दायक ठरू शकतो.
Location :
Maharashtra
First Published :
September 12, 2025 5:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
10वी -12वी च्या बोर्डाच्या परीक्षेत होणार मोठा बदल, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी