Bank of Maharashtra Bharti 2025 : 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 350 पदांसाठी भरती, मिळणार 1,56,500 रुपये पगार; असा करा अर्ज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Bank of Maharashtra Bharti 2025 : 'बँक ऑफ महाराष्ट्र' बँकेमध्ये नवख्या तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बँकेने ऑफिसर स्केल II ते स्केल VI पर्यंतच्या 350 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अनेक तरुणांचे बँकेत काम करण्याचे स्वप्न असते. आता अशातच अनेक तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी बँकेमध्ये नोकरीच्या संधी आहेत. 'बँक ऑफ महाराष्ट्र' बँकेमध्ये सरकारी नोकरीच्या संधी आहेत. नुकतीच नोकरीसंबंधीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
'बँक ऑफ महाराष्ट्र' बँकेमध्ये नवख्या तरुणांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बँकेने ऑफिसर स्केल II ते स्केल VI (Generalist Officer) पर्यंतच्या 350 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. यासाठीची अर्ज प्रक्रिया 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचे असतील ते इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
advertisement
जर तुम्हीही बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर, आजच अधिकृत जाहिरात वाचून अर्ज दाखल करा. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे. शिवाय परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज दाखल करायचा आहे, त्या उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
advertisement
बँकेमध्ये केल्या जाणाऱ्या भरतींसाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, बीई (अभियांत्रिकी पदवी), बीटेक (तंत्रज्ञान पदवी), एमएससी (मास्टर ऑफ सायन्स) किंवा एमसीए (मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स) सारख्या पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 35 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे असावे, मात्र सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांना वयात सूट दिली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. इतर मागास वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
advertisement
अर्ज करताना ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी 1180 रुपये आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 118 रुपये असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग सारख्या ऑनलाइन पद्धतीने हे शुल्क तुम्ही भरू शकता. पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना सर्वात पहिले ऑनलाइन लेखी परीक्षा द्यावी लागेल. जर त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
advertisement
या पदांसाठी ज्यांची निवड होईल त्या उमेदवारांना आकर्षक पगार पॅकेज मिळेल जे स्केलनुसार बदलू शकेल. स्केल VI साठी दरमहा 1,40,500 ते 1, 56, 500 रुपये, स्केल V साठी 1,20,940 ते 1,35,020 रुपये, स्केल IV साठी 1,02,300 ते 1,20,93 रुपये, स्केल III साठी 85,920 ते,05,280 रुपये आणि स्केल II साठी 64,820 ते93,960 रुपये दरमहा वेतन असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bank of Maharashtra Bharti 2025 : 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये 350 पदांसाठी भरती, मिळणार 1,56,500 रुपये पगार; असा करा अर्ज