Marathi Movies : 'या' वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट पाहायला जाणार? 'दशावतार', 'आरपार' की 'बिन लग्नाची गोष्ट'

Last Updated:

Marathi Movies : यंदाचा वीकेंड सिनेप्रेमींसाठी खूपच खास आहे. या वीकेंडला प्रेक्षकांना पाहण्यासाठी 'दशावतार','आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' हे तीन चित्रपट सज्ज आहेत.

News18
News18
Marathi Movies : मराठी मनोरंजनसृष्टीला अखेर सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. 1 मे 2025 रोजी 'आता थांबायचं नाय' आणि 'गुलकंद' हे दोन मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले. या वेगवेगळ्या जॉनरच्या असलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. अशातच या आठवड्यातही 'दशावतार','बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' हे तीन मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमने-सामने आले आहेत. त्यामुळे रोमँटिक, भावनात्मक, थरार-नाट्य असं सर्वकाही या वीकेंडला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दशावतार : कलेचा, भक्तीचा आणि परंपरेचा उत्सव असणारा 'दशावतार' हा चित्रपट आहे. साऊथचा टच असणारी ही भव्यदिव्य कलाकृती आहे. गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास या चित्रपटात करण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वडगबाळकर अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या निरनिराळ्या छटा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
advertisement
बिन लग्नाची गोष्ट : प्रिया बापट आणि उमेश कामत या मराठी इंडस्ट्रीतील गोड जोडीचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवेल. आदित्य इंगळेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'बिग लग्नाची गोष्ट' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रिय-उमेशची जोडी तबब्ल 12 वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. प्रिया-उमेशसह या चित्रपटात गिरिश ओक आणि निर्मिती सावंतदेखील झळकणार आहेत. मायेच्या माणसांवर प्रेम करायला लावणारा हा चित्रपट आहे.
advertisement
आरपार : हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा चित्रपट आहे. तरुणांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. विशेष म्हणजे हृता आणि ललितच्या वाढदिवशी 12 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. प्रेमात वेड लावायची ताकद असते, हे सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ गाणी आहेत. ऋषी मनोहरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. गेले काही दिवस या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Movies : 'या' वीकेंडला तुम्ही कोणता चित्रपट पाहायला जाणार? 'दशावतार', 'आरपार' की 'बिन लग्नाची गोष्ट'
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement